prabodhini news logo
Home घुग्घुस शिवसेना ऊबाठा तर्फे आढावा बैठक संपन्न

शिवसेना ऊबाठा तर्फे आढावा बैठक संपन्न

0
232

गणेश शेंडे घूगूस ९७६४८९०८०९ -आज दिनांक,15,6,2025 ला चंद्रपूर महानगर पालिका व नगर परिषद, नगरपंचायत व होणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीकरिता शिवसेनेचे वरिष्ठ नेते माननीय आमदार विदर्भ संपर्कप्रमुख नेते श्री भास्कर जी जाधव साहेब माननीय श्री विजय जी कदम साहेब उपनेते शिवसेना माननीय संपर्कप्रमुख प्रशांतजी कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय जिल्हाप्रमुख शिवसेना चंद्रपूर संदीप भाऊ गिरे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 15 6 2025 रोज रविवारला शिवसेना उभाटातर्फे आढावा बैठक घेण्यात आली. सदर आढावा बैठक ही वरून नका पत्रकार भवन येथे ठीक अकरा वाजता सुरू झाली या बैठकीमध्ये संपूर्ण वरिष्ठ नेत्यांनी होणाऱ्या महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत ग्रामपंचायत च्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढण्यास इच्छुक आहे असे संकेत दिले व तसेच संपूर्ण पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आपापल्या प्रभागांमध्ये जाऊन पक्ष संघटनेचे कार्य वाढवावे व इच्छुक उमेदवार निवडणुकीकरिता कामाला लागावे अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी आज या ठिकाणी विश्राम भवन पत्रकार संघ येथे सर्व पूर्ण पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांनी दिल्या करिता संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते यानंतर वाटाघाटातर्फे संपूर्ण ताकदीनिशी एक दिलाने एक मनाने होणाऱ्या महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयारी करून निवडणुकीला सामोरे जाणार आहे अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here