prabodhini news logo
Home गडचिरोली मा.खा. डॉ. अशोक नेते यांची सिरोंचा येथे सांत्वन व सदिच्छा भेट

मा.खा. डॉ. अशोक नेते यांची सिरोंचा येथे सांत्वन व सदिच्छा भेट

0
149

रमजान खान यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन व कलाम हुसेन यांच्या निवासस्थानीसदिच्छा भेट

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १६ जून २०२५ माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते सिरोंचा दौऱ्यावर असताना त्यांनी समाजातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंधित भावनिक व सामाजिक उत्तरदायित्व निभावले.

प्रथम, सिरोंचा येथील मुस्लिम समाजाचे आदरणीय नेते व समाजसेवक स्व. रमजान खान यांचे दि. ११ जून २०२५ रोजी अचानक निधन झाले. याची माहिती भाजपा युवा नेते शारिक शेख यांनी मा.खा.डाॅ.अशोक नेते यांना दिल्यानंतर त्यांनी खान कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देत सांत्वन केले. शोकाकुल वातावरणात कुटुंबीयांचे सांत्वन करताना मा.खा.डॉ. नेते यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत दुःखद प्रसंगी धीर दिला. रमजान खान हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक होते आणि त्यांच्या जाण्याने परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मा.खा.डॉ. नेते यांनी शोक व्यक्त केले.

यानंतर, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष कलाम हुसेन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मा.खा. डॉ. नेते यांनी त्यांची तब्येत विचारली. काही काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. सुदैवाने त्यांनी त्या आजारावर मात केली असून, आता ते उत्तम प्रकृतीत आहेत. याबद्दल आनंद व्यक्त करत डॉ. नेते यांनी त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या दोन्ही भेटीप्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, माजी उपसभापती रहिमभाई, शारिक शेख यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा.खा. डॉ. अशोक नेते यांची ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर माणुसकी, सहवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रत्यय देणारी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here