तुलशी नगर वार्डातील नाली व सिमेंट रस्त्याचे त्वरित बांधकाम करावे

0
171

शिवसेना उभाटा तर्फे प्रशासनाला निवेदन

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिनांक 16 6 2025 रोज सोमवारला शिवसेना महिला संघटिका चंद्रपूर व समस्त नागरिकांच्या वतीने कुसुम उदार यांच्या नेतृत्वात तुलसी नगर वार्ड क्रमांक चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे. या भागात मागील अनेक वर्षापासून रस्त्यावर गोटे निघाले आहे मोठे मोठे खड्डे सुद्धा पडलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी स ये जा करण्यास नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावा लागतो यापूर्वीसुद्धा प्रशासनाला पुष्कर चे पत्र दिले परंतु आज पर्यंत या रस्त्याचे काम झाले नाही म्हणून आज पुन्हा महानगरपालिका आयुक्त चंद्रपूर व माननीय आमदार किशोर जोरगेवार यांना पत्र देऊन लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा जेणेकरून पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती होणार व बांधकाम करण्यात यावे म्हणून शिवसेना उभाता गटातर्फे चंद्रपूर संघटिका कुसुम उदार यांच्या नेतृत्वात वासुदेव के श्रवण देवतळे, पल्लवी देवगडे, वीणा देवगडे, आशा पावडे, प्रशांत राऊत, राजेश नक्षीने, सत्यशीला भोंगळे व ललिता शाहू यांनी निवेदन दिले व लवकरात लवकर आपण सदर रस्त्याचे बांधकाम करावे अशी विनंती करण्यात आली अन्यथा नाईलाज असतो आम्हाला शिवशाही पद्धतीने किंवा आंदोलन उभारावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here