तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका का प्रबोधिनी न्यूज़ – चंद्रपूर – दि. 24 जून 2025 – उत्कृष्ट महिला मंच च्या वतीने चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील नृत्यप्रेमींना केंद्रस्थानी ठेवून एक अनोखी व भव्य *लावणी नृत्य सादरीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 21 व 22 जून 2025 रोजी दोन दिवसीय ही कार्यशाळा चंद्रपूर येथील सेंट मायकेल स्कूलच्या सभागृहात उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेची खासियत म्हणजे ती ‘लावणी नृत्यविष्कार जागतिक विक्रम’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ ठरली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरातून सुमारे ५०० पेक्षा अधिक नृत्यप्रेमी आणि ७०-८० नृत्य प्रशिक्षक सहभागी झाले.
कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुण्याचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रत्नाकर शेळके यांनी उपस्थित राहून सहभागींना लावणी नृत्याचे कौशल्य शिकवले. यामधूनच पुढे 4 जानेवारी 2026 रोजी चांदा क्लब मैदानावर एकाच वेळेस 5000 नृत्यांगना 25 मिनिटे सलग लावणी सादर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’ आणि ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल या दोन जागतिक विक्रमांमध्ये नाव नोंदविण्याचा मानस आहे.
या उपक्रमाच्या ठिकाणी चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थितांचे मनोबल वाढवले व उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्ष छबुताई वैरागडे यांच्या या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले. त्यांनी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ही दिले.
कार्यक्रमाच्या विशेष उपस्थितींमध्ये सुभाष कासंनगोटूवार, राहुल घोटेकर, स्मिता म्हैसकर, तुषार सोम, तसेच सिनेट सदस्य निलेश बेलखडे, शाम बोबडे (भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष), निखिल शेंडे, जावेद, प्रशांत कात्तूरवार, आणि तृप्ती चिद्रावार यांचा समावेश होता.
कार्यशाळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ८ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ६० वर्षांपर्यंतच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, ज्यामुळे हा उपक्रम अधिक रंगतदार ठरला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्ष छबुताई वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली *साक्षी कार्लेकर, नंदराज जीवनकर, सागर अंदणकर, किरण बल्की, स्नेहल बांगडे, पूजा पडोळे, वैशाली कन्नमवार, सुमेधा श्रीरामे, माया खनके, जयश्री साखरकर, मनीषा भाके, योगिता धानेवार, संगीता बोरीकर, वसुधा बोडखे, अर्चना चहारे, मनीषा कन्नमवार* आणि इतर अनेक स्वयंसेवकांनी अविरत परिश्रम घेतले.
हा उपक्रम केवळ एक कार्यशाळा न राहता, *संघटनशक्ती, सांस्कृतिक वारसा आणि महिलांच्या कलागुणांचा जागर* बनला असून, चंद्रपूरचे नाव लावणीसारख्या लोककलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहचवण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल आहे.

