देवळा तालुक्यातील वसाका कर्मचाऱ्यांचे मौन आंदोलन

0
74

महाराष्टात पहिल्यांदाच साखर कामगारांच्या पत्नी पोटासाठी आंदोलनात सहभागी होताना

सुरेखा गांगुर्डे देवळा तालुका प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसापासून अनेक प्रसार माध्यमातून एकच गोष्ट कानावर येत होती 25 तारखेला वसाका कर्मचाऱ्याचे आंदोलन आखिर हे आंदोलन आज रोजी चालू झाले, अनेकदा निवेदन देऊनही कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, आज दोन दिवस रोजगार नसला तरी किती अडचणीना सामोरे जावे लागते पण कित्येक वर्षांपासून हा कारखाना बंद आहे कामगारांना रोजगार नाही तर अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागत असेल ह्या मुद्दा मात्र अनुत्तरित च आहे, आज रोजी देवळा तालुक्यात शिवस्मारक जवळ हे मूक आंदोलन करण्यात आले, ह्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सामील होताना दिसत आहे, महिला वर्गाचा सहभाग ही मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे, तर आज अनेक व्यक्तींच्या मनात एकच प्रश्न आहे विधवा भगिनींचा आक्रोश बघून शासन प्रशासनाला पाझर फुटेल का….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here