जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘जागतिक आलिम्पिक डे’

0
34

किशोर मडगूलवार जिल्हा संपादक, चंद्रपूर – दि 25 : जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलिम्पिक विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानूसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने ‘जागतिक आलिम्पिक डे’ साजरा करण्यात आला. यावेळी खेळाडूंची भव्य रॅली चंद्रपूर शहरात काढण्यात आली. बॅनर व स्लोगनसह असंख्य खेळाडूंनी या रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
त्यानंतर जिल्हा क्रीडा संकूल येथे चर्चासत्र, परिसंवाद व कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड होते. याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, संदीप उईके, क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, मनोज पंधराम, ,नंदु अवारे, मोरेश्वर गायकवाड, फुटबॉल प्रशिक्षक अभिषेक डोईफोडे, खेलो इंडीया प्रशिक्षक रोशन भुजाडे आदी उपस्थित होते.
आलिंम्पिसाठी भारताचे स्वप्न व खेळाडूंची भूमिका यावर अविनाश पुंड यांनी मार्गदर्शन केले. कार्यकमाचे प्रास्ताविक संदीप उईके यांनी, संचालन मोरेश्वर गायकवाड यांनी तर आभार रोशन भुजाडे यांनी मानले. संपूर्ण जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांच्याकडून ‘जागतिक आलिम्पिक डे’ साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here