
विवेक मिरालवार तालुका प्रतिनिधी अहेरी 8830554583 – आलापल्ली: वीर बाबूराव शेडमाके सभागृहात सत्कार कार्यक्रम घेण्यात आले. या सत्कार समारंभात स्वराज्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचे सत्कार करण्यात आले.स्वराज्य फाउंडेशन हे सामाजिक संस्था आहे हे जे गरजू गरीब लोकांकरिता नेहमी त्यांचा सुख दुःखात सोबत राहतात त्यांचा प्रत्येक अडचणीला मदतीला जाण्याचा धाडस करतात पावसाने अनेक वेळा अनेक ठिकाणी पूर आले अश्या वेळेस स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य पूरग्रस्तांनच्या मदतीला आपल्या जीवाची पर्वा नकरता माध्यरात्री धावले.
स्वराज्य फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेच्या साह्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्याचा काम स्वराज्य फाउंडेशन करत येत आहे.तसेच रुग्णांना रक्त मिडवून देण्यासाठी प्रामाणिक मदत स्वराज्य फाउंडेशन हे नेहमी करत असतात.
अश्या उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या स्वराज्य फाउंडेशनच्या कार्याचा सुशीला बुद्धभगवान भगत मॅडम
से. नी. अंगणवाडी पर्यवेक्षिका तथा समाजसेविका, रा आलापल्ली ने संविधान ग्रंथ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार समारंभ घेऊन स्वराज्य फाउंडेशनचे सत्कार करण्यात आले.
या वेळेस सुशीला भगत मॅडम म्हणाल्या स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून इतके प्रभावी काम करत आहेत आपण यांना सोन, चांदी तर देऊ शकत नाही पण यांना शाब्दिक आधार देऊन यांचा कामाची मूल्यांकन तर करू शकतो म्हूणन माझ्याकडून प्रत्येकाला भारताचे संविधान ग्रंथ व सन्मानचिन्ह देत आहे.















