आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व्यक्ती / संस्थेकडून अर्ज आमंत्रित

0
46

अंतिम दिनांक 4 जुलै 2025 पर्यंत

चंद्रपूर – दि. 26 : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ व ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येणार आहे. चंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपुर, बल्लारपुर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, मुल, सावली, सिंदेवाही, पोंभुर्णा या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांच्याकडून 2023-24 व 2024-25 या वर्षाकरिता प्रस्ताव आमंत्रित आहेत.
सदर प्रस्ताव 4 जुलै 2025 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर येथे स्विकारण्यात येतील. विनामुल्य प्रस्तावाचा नमुना व आवश्यक सर्व माहितीसाठी कृपया प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here