prabodhini news logo
Home कोपरगाव माहेगांव कुंभारी येथील शिव रास्ता दोन ठेकेदारा यांनी केले निष्कृष्ट पद्धतीचे काम

माहेगांव कुंभारी येथील शिव रास्ता दोन ठेकेदारा यांनी केले निष्कृष्ट पद्धतीचे काम

0
201

नवनाथ ऊल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील माहेगाव कुंभारी येथील शिव रस्ता असून आतापर्यंत तीन वेळेस सदर रस्त्याचे खडीकरण झालेले आहेत परंतु रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे व्यवस्थित झालेले नाही सदर शिवरस्ता हा कोपरगाव कोळपेवाडी या रस्त्यापासून सुरू होऊन माहेगाव मढी या रस्त्यापर्यंत अंदाजे 3 किलोमीटर आहे. सदर रस्त्यासाठी 2किमी चे काम रुपये 10 लाख मंजूर असताना मात्र दीड किमी रस्ता खडीकरण केला तोही पावसाळ्यात सध्या वापरण्यात योग्य नाही. सदर रस्त्याच्या कामामुळे तेथील रहिवासी स्वतःच्या कामामुळे येण्या जाण्यासाठी त्रस्त झालेली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांची तसेच नोकरदार शेतकरी यांचे अतोनात हाल होत आहे. निवडणुकी च्या काळात सरपंच व आमदार यांनी जनतेला दिलेले आश्वासन यावर पाणी फिरलं असे प्रश्न तेथील ग्रामस्थांच्या मनात निर्माण होत आहे. तरी संबंधित अधिकारी या रस्त्याकडे लक्ष देणार आहे की नाही असाही प्रश्नचिन्ह तेथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here