शेतकरी कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…

0
98

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज ब्रम्हपुरी येथे शेतकरी कर्जमाफी, बोनससह संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदानाच्या अनुषंगाने तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या विराट जन आक्रोश मोर्चात सहभागी होत संवाद साधला.

राज्यातील या महायुती सरकारकडे शक्तीपीठ मार्ग बांधण्यासाठी दीड लाख कोटी रुपये आहेत. मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत, उद्योगपतींचे १९ लाख कोटी रुपये मोदी सरकारने माफ केले पण शेतकऱ्यांची कर्जमाफीची वेळ आली तर समिती नेमण्याची घोषणा हे लोक करत आहे. सत्तेसाठी कर्जमाफीचे खोटे आश्वासन देणाऱ्या या सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

या सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, संपुर्ण शेतकऱ्यांची बोनसची रक्कम ८ दिवसाच्या आत जमा करण्यात यावी. संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून थकित असलेले मानधन तात्काळ देण्यात यावे. सामुहिक वन हक्क समितीमध्ये होत असलेल्या गैरप्रकारची चौकशी करुन राधा ऑर्गनायजेशनवर कारवाई करण्यात यावी. अनुसुचीत जाती / जमातीच्या विकासाकरीता तरतूद करण्यात आलेला निधी इतरत्र वळवू नये व तो अनुसूचित जाती जमातीच्या उन्नतीसाठी खर्ची करण्यात यावा. सौर उर्जेच्याऐवजी पारंपारिक विज जोडण्यात यावी व शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.

सदर मोर्चाला भर पावसात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून सुरुवात होवून तहसील कार्यालय ब्रम्हपूरी येथे समाप्ती झाली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी नगरसेवक डॉ.नितीन उराडे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, कृउबा संचालक किशोर राऊत, तालुका काँग्रेस सचिव सतीश डांगे, विजय तुमाने, निनाद गडे, किसान काँग्रेसचे वामन मिसार, अतुल राऊत, पुष्पाकर बांगरे, माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, कृउबा उपसभापती सुनीता तिडके, माजी नगरसेविका लता ठाकुर, माजी जि.प.सदस्य भावना ईरपाते, माजी पं.स.सदस्य देवेंद्रा मडावी यांसह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, निराधार योजनेचे लाभार्थी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here