
कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 – परमपूज्य भागवत बाबा शिंदे खडक माळेगाव यांच्या आशीर्वादाने श्री शेत्र कोटमगाव येथील गेली 59 वर्षापासून सेवेत असलेले जेष्ठ श्रेष्ठ भावी व काही अनंतात विलीन झालेले भाविक असतील अशा या भाविकांच्या योग्य मार्गदर्शनाने लाभलेल्या योग्य संस्कार व त्यात संस्काराची प्रवृत्ती म्हणून निघालेल्या या भव्य मोठा पायी दिंडी सोहळ्याचे कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे भक्तिमय वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले. शनिवार दिनांक 21 6 2025 रोजी श्री शेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री शेत्र पंढरपूर कडे प्रस्थान होऊन या दिंडीचे दुपारचे भोजन व्यवस्था दत्तात्रय पवार चासनळी यांनी दिले. या भोजनाप्रसंगी गावातील ग्रामस्थांनी हे मोठ्या प्रमाणावर साथ दिली. व माझ्या हातातून असेच ईश्वर कार्य घडावे असे दत्तात्रय पवार यांनी सांगितले. या दिंडीमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सर्वांच्या मुखातून एकच नाम राम कृष्ण हरी .राम कृष्ण हरी. प्रथम दिंडीचे चालक गायनाचार्य भारूडकार कीर्तनकार महाराज यांचा नारळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व नंतर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी या जयघोषाने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले












