
डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर शहरातील 21/6/2025 ला सात दुकाने आणि दिनांक 26/6/25 ला देव्हाडी गावाचे 6 दुकान व तुमसर शहराची 1असे मिळून 14 दुकाने फोडण्यात आली .ह्या चोरी घडलेल्या दुकानांमध्ये काही किराणा स्टोअर ,पानपटरी ,हॉटेल, फर्निचर, असे दुकाने होते .अखेर तुमसर पोलीस स्टेशन आणि भंडारा जिल्ह्याचे पोलीस दलाचे यांच्या संयुक्त कारवाईने पाच चोर पकडण्यात आले. आरोपी आकाश श्याम कोल्हटकर /( 30 )रा.मालवीय नगर तुमसर ,बादल रंजीत गौरे (25 )मालवीय नगर तुमसर ,हर्षद विनोद शिंगाडे (27) खैरलांजी, सुरेश प्रेमलाल सहारे (28) देव्हाडा (बु.) ,प्रांजू भाग्यवान खोब्रागडे (27) तामसवाडी यांना पोलिस यांनी अटक करून चोरी करण्यात येणारे साहित्य आणि काही नगदी रूप रक्कम जप्त करण्यात आली. भंडारा जिल्हा पोलिस उप अधीक्षक प्रशांत कुलकर्णी व एलसीबी प्रमुख नितीन चिचोळकर ह्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. कोर्टात पिसीआर मागुन सखोलपणे चौकशी करण्यात येणार.















