
डॉ. सुखदेव काटकर तालुका प्रतिनिधी, तुमसर- तालुक्यातील लोभी ते आष्टी डांबरी रस्त्यावर भरधाव गाडी चालत असतानी चालकाच्या भान अनियंत्रण झाले आणि झाडाला जाऊन टक्कर दिली. त्यात चालकाच्या जागीच मृत्यू झाला. या दुचाकी वर दोन व्यक्ती होते. एकाचा मृत्यू झाले आणि दुसरा जखमी झाला. मृतक चे नाव संजय प्रेमलाल टेकाम (30) कारली .असे असून जखमी चे नाव कैलास विठ्ठल ऊईके (23) आसल पाणी यांच्या समावेश आहे. हे दोघेही लोभी परिसरातील नहराच्या कामावर मजुरी साठी येत होते. काही कामानिमित्त त्यांना आष्टी गावाला जायचं होतं .अचानक ही घटना घडली. ही घटना दिनांक 28 /6 /2025 सकाळी ११ वाजता च्या दरम्यान ही घटना घडली .या अचानक मृत्यूमुळे कुटुंब चे सर्व लोकांना दुःखाचे डोंगर कोसळलं आणि त्याच परिक्षेत्र चा लोकांना शोक कळा पसरली. घटनेची माहिती लोभी गाव चे पोलीस पाटील शेषराव यदुनाथ देशमुख यांनी गोबरवाही पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. आणि पुढची कारवाई सुरू केली. प्रत्येक व्यक्ती ला घाई असते पण जिवा पेक्षा दुसरा काही नसतो हे सर्वांना माहीत असले पाहिजे.















