prabodhini news logo
Home मराठवाडा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सुगंध मातीचा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सुगंध मातीचा

0
129

सुगंध मातीचा
बहर सुखाचा
मनी ओलावा
तुझ्याच प्रेमाचा।।

खरोखरच पहिला पाऊस आला की की ओढ लागते त्या मातीच्या सुगंधाची. उन्हाने धरती खुप तप्त झालेली असते ग्रीष्मात
जमीन अगदी तापून सुलाखून निघालेली असते, आणि जेंव्हा पाऊस येतो तेंव्हा त्या त्या मातीला एक प्रकारचा रम्य सुंदर वास येत असतो. आणि सर्व पृथ्वी सुगंधीत होत असते त्यामुळे तिला गंधवती पृथ्वी असेही म्हणतात, हा वास सर्वत्र पसरत असतो आणि पृथ्वीवर नवं चैतन्य येत असते, पहिल्या पाऊस म्हटलं की एक प्रकारचा उत्साह राहतो आणि त्या मातीच्या सुगंधाची बातच काही औरच असते. हाच मातीच्या सुगंध घेण्यासाठी सर्वजण असुलसलेले असतात, असा सुगंध कधी कोणीच निर्माण केले नाही की पुढेही करणार नाही मला हाच मातीचा सुगंध खूपच आवडतो माझे मन अगदी प्रसन्न। होते, असे वाटते की काही ही पृथ्वी सुगंध पसरत येत आहे, आणि हाच सुगंध जीवनात सदा सर्वकाळ दरवळत रहावा असेच वाटते.
धुंद पावसात हाच मातीचा सुगंध, सोबतीला तुझी सूंदर रम्य आठवण आणि येणारा पाऊस जणू काही मनाला वेड लावून जाते. तू नेहमी सांगत राहायचा की किती रम्य मोहक वास आहे अगदी तुझ्या सारख मन प्रसन्न करणारा आहे तेंव्हा तोच मातीचा सुगंध मी तुझ्या प्रेमळ हाताच्या स्पर्शाने अगदी मोहरून जात असे, तुझी तीच आठवण आज मीही जपून ठेवले आहे अगदी मातीच्या रम्य सुंदर सुवासा सारखे.म्हणून मला तुझा आणि मातीचा सहवास नेहमी हवा हवा वाटतो. असाच पाऊस यावा आणि त्या धुंद पावसात मस्तीचा सुगंध घेऊन तू अलगत माझ्या जीवनात दरवळत राहतोस.तोच पाऊस, तीच मोहन दरवळ आणि तुझी आठवण मला नेहमी एक आनंद देणार स्वप्नं आहे. आणि असे वाटते की त्या स्वप्नांच्या दुनियेत मी आजही दरवळत राहाते तोच मातीचा रम्य मोहक सुगंध होऊन अगदी गुलाबा सारखा टवटवीत.

ओढ मातीची आवडते
सुगंध घेऊन सावडते
त्याच मातीचा सुगंध होऊन
फुलपाखसारखे बागडते।।

लेखिका प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here