
संघर्ष भगत
मुकुटबन – झरी
8408051995
झरी तालुक्यातील आर्या इंटरनॅशनल स्कूल मुकुटबन हे शाळा आपल्या कलागुणांना वाव देण्यास एकमेव शाळा मानली जातात.अश्यातच आज आर्या इंटरनॅशनल स्कूल मुकुटबन येथे भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा सकाळी नऊ वाजता काढण्यात आली.विठुरायाच्या वेशभूषेत वर्ग नर्सरी ते वर्ग तिसरा येथील विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करून संपूर्ण मुकूटबन वासीयांचे मन जिंकून घेतले.हा त्यांचा अनेक वर्षांपासूनचा भक्ती मार्गाचा उपक्रम सुरू आहे. “वारी आषाढीची, आस विठुरायाच्या भेटीची” ह्या म्हणीप्रमाणे ह्याच आशेने कित्तेक लाखो वारकरी भक्तीमार्गाच्या वाटेवरून जाऊन पूर्ण वारी करतात.पंढरीच्या विठुरायाला साकडं घालतात याच निमीत्ताने “बा विठ्ठला,तुझ्या चरणी एकच मागणं तमाम वारकरी बांधवांना व शेतकऱ्यांना कायम सुखी ठेव त्यांना सुख – समृध्दी लाभू दे या अशी घोषणा देखील पालखी सोहळ्यात देण्यात आल्या.यावेळी बबिता झवेरी ,निलेश चौधरी, सुभाष गजभिये, आशिष यमजलवार,रमण मोट्टेमवार सुनीता बरशेट्टीवार, रुपाली टिकले, स्नेहल कापनवार, वैशाली आसमवार, अंकिता भोगेकर,आळंदी ताजने, मोनिका गड्डमवार, श्वेता पवार, आचल मोहूर्ले, किना खाडे आणि ओम नगरी परिसरातील सर्व महिला मंडळी गावकरी व सर्व शालेय कर्मचारी उपस्थित होते.















