
पावसाच्या धारा रिमझिम चालू होताच तपलेल्या जमिनीवर जेव्हा पावसाचा ठोका पडतो तेव्हा तबल्याप्रमाणे जसा तो तालात वाजवताना त्याचा शब्द जसा गोड वाटतो. त्याचप्रमाणे मातीचा सुगंध एवढा अल्हादक, मनमोहक वाटतो तो सुगंध घेतच राहावा व ती ओली चिंब जमीन होताना उत्साहाने पावसाच्या सरींना हातात पकडण्याची इच्छा होते .पण त्या सरी हातात न येता जमिनीवरच पडतात. कारण त्या पावसाची प्रीत जी आहे जमिनीशीच असते .त्यांचं असं घट्ट नातं असतं त्याला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी तो जमिनीवरच पडत असतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्याची पावसाची अशी मैत्री असते की तो पावसाचे आवाहन पेरणीच्या वेळी करीत असतो .आणि आपल्या या शहरी भागात तर सिमेंटची रस्ते मोठमोठे झाल्यामुळे शहरी भागातील व्यक्तीला त्या मातीचा सुगंधमय परिमळ क्वचितच घ्यायला मिळत असतो .कारण त्याचा जमिनीशी नातं तर असतं पण सिमेंट टाईल्स च्या सानिध्यात जास्त वावरतात. व हा शेतकरी जो आहे याचे जीवनच काळी माय आहे. याचं आई मुलासारखं नातं असतं.
लेखिका रंजना भैसारे
नागपूर















