prabodhini news logo
Home चंद्रपूर Access To Justice For Children विषयावर महाकाली कॉलरी मनपा इंग्रजी मीडियम स्कूल...

Access To Justice For Children विषयावर महाकाली कॉलरी मनपा इंग्रजी मीडियम स्कूल येथे कार्यशाळा

0
94

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महाकाली कॉलरी मनपा इंग्रजी मीडियम स्कूल येथे Access To Justice For Children या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच, ट्रिकी टच हा काय प्रकार असतो व प्रलोभन देऊन बालकांना कशा पद्धतीने बळी पाडले जाते याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.
या प्रसंगी मोबाईलचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम मोबाईलमुळे होणाऱ्या अडचणी, Screen Addiction,बालविवाह व त्याचे परिणाम, यात सामील होणाऱ्यांना शिक्षेची तरतूद व त्यासाठी कोणत्या यंत्रणेचा व कसा वापर केला जातो? लैंगिक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण कायदा काय आहे?शासनाने बालकांसाठी व महिलांसाठी उपलब्ध केलेले टोल फ्री क्रमांक काय? त्याचा वापर कधी कसा करावा? बालकांसाठी शासन दरबारी कोणकोणत्या विभागांमध्ये बालकांची काळजी आणि योजनांवर सरकार काम करते याबाबतची माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here