prabodhini news logo
Home कुरखेडा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – माता-पित्याची सेवा, हिच गुरू...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – माता-पित्याची सेवा, हिच गुरू सेवा….!!

0
155

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः

गुरुपौर्णिमा हा भारतीय मराठी सण म्हणून मानला जातो. हा सण आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. गुरु पौर्णिमा हा सण भारतीय लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी आपल्या गुरुची पूजा केली जाते.
गुरुपौर्णिमा म्हणजे काय बरं? या दिवशी गुरु विषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला जातो. गुरुची पूजा केली जाते. सर्वांचे पहिली गुरु म्हणजे आई वडील असतात आणि दुसरे गुरु म्हणजे शिक्षक असतात.
पण माझे काहीतरी वेगळेच आहे. कोणी विचार सुद्धा नसतील केले माझे ते विचार आहेत. माझे पहिले गुरु,”ज्यांनी मला जन्म दिला म्हणजे माझे आई-वडील.”आणि दुसरे गुरु म्हणजे ज्यांनी मला लागण्याचे मोठे केले म्हणजे माझे आज्जी, आजोबा आणि मावशी. यांचा सर्वांचा माझ्या जीवनात सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे.
आपल्याला आपल्या गुरुचे आदर,सन्मान, केला पाहिजे. गुरु म्हणजे दैवत. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने आपण समोर जात असतो. पण मला समजत नाही की लोक फक्त या गुरु पौर्णिमेच्या सणाला पूजा करतात आपल्या गुरुची. पुजा तर रोज केली पाहिजे आपल्या आई-वडिलांची. गुरुपौर्णिमा हा एक, एका- दिवसाचाच सण आहे. जो दरवर्षी इतर सणाप्रमाणे येतो.
मग याच दिवशी का दाखवायचं गुरुचे आदर आणि सन्मान करतो म्हणून. रोज आपल्या आई-वडिलांचे आदर, सन्मान आणि पूजा केली पाहिजे. गुरुपौर्णिमा हा एकाच दिवसासाठी नाही तर रोजच्या जीवनात आचरणात आणणारा हा सण आहे. आपण ते करत नाही. आषाढ महिना सुरू झाला की वारकरी पंढरपूरला जातात. पांडुरंगाच्या सेवेसाठी लोकं पंढरपूरला जातात.
मी सांगते तुम्हाला की, पंढरीच्या वारीला नाही जाता आलं तरी चालेल. पांडुरंग असं नाही म्हणत, या भक्तांनो माझ्या वारीकरिता. पांडुरंग असं म्हणतात की तुम्ही कुठेही राहुल माझी सेवा केली तरी ती माझ्यापर्यंत पोहोचतेच.
तुम्हाला पुंडलिकाची गोष्ट तर माहितीच असेल, एका दिवशी पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता त्या दिवशी दरवाजावर श्री विष्णू आले आणि म्हणाले, की पुंडलिक मी तुझ्या दरवाज्यावर आलो आहे मला आत नाही बोलवणार काय? साक्षात देव तुज्या दारी आलं आहे .तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या सेवेत एवढं मग्न होता की, तो श्री विष्णू ला म्हणाला की तू या विथे वर उभा रहा. जिथपर्यंत माझी आई वडिलांची पूर्ण सेवा होत नाही. नंतर मग आई-वडिलांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुंडलिक श्री विष्णू ची माफी मागू लागला. तेव्हा श्री विष्णू पुंडलिकावर प्रसन्न झाले आणि म्हणाले तुला काय पाहिजे सांग तर, पुंडलिक म्हणाला देवा अखंड सृष्टीचे मालक तुम्ही आहात आणि तुम्ही माझे दारात आलात मी तुमच्याकडे यायचं तर तुम्ही माझ्याकडे आलात माझ्यासाठी हेच खूप आहे. तरीपण श्री विष्णू म्हणाले की माग पुंडलिका तू जे मागशील मी ते तुला देईल . मग पुंडलिक म्हणाला,देवा चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही या पंढरपूरमध्ये थांबा भक्तांचा कल्याण करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी. म्हणून तुम्ही बघितलं ना युगे युगे गेली तरी पांडुरंग भक्तांसाठी तिथे उभा आहे पंढरपूरला.
अख्या या सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त आई-वडिलांचा सेवा करणारा म्हणजे खर तर एकच आहे तो म्हणजे पुंडलिक. तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचं असेल ना ,तर आई-वडिलांची सेवा करा निस्वार्थपणे सेवा करा.
तुम्ही तुमच्या आई-वडिलांची सेवा कराना खरं म्हटलं तर तेच तुमचे विठ्ठल रुक्मिणी आहेत. तुम्ही विठ्ठल रुक्मिणी आपल्या आई-वडिलांच्या रूपात बघा.
तुम्हाला सांगते मी, जो व्यक्ती देवाला आपल्या आई वडिलांच्या रूपात पाहतो तोच खरा माणूस असतो.
माझ्यासाठी तर माझी आई वडील विठ्ठल रुक्मिणी आहेत. माझे खरे देव म्हणजेच माझे आई-वडील आहेत. गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ केव्हा असते तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आपण रोज आपल्या वागणुकीतून, आपल्या कृतीतून आपल्या आई-वडिलांचा सन्मान करतो तेव्हाच गुरु पौर्णिमेचा खरा अर्थ ठरतो. गुरुपौर्णिमा ही फक्त एकाच दिवसासाठी साजरी करायची म्हणजे करायची नाही.
नाहीतर त्या दिवसापूर्ती गुरुपौर्णिमा साजरी करायची आणि दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना विचारायचं पण नाही. असे असतात काही काही लोक. आपल्याला रोज गुरुपौर्णिमा वागल पाहिजे. तुम्ही जर रोज तुमच्या आई-वडिलांची सेवा केली तर हीच तुमची गुरुपौर्णिमा होईल.
मग तुम्हाला देवाचे दर्शन घ्यायची गरज पडणार नाही. कारण खरे देव तर आई वडीलच आहेत. पण मला या भारतीय संस्कृती ची शोकांतिका वाटते की, इथले लोक फक्त याच दिवशी आई-वडिलांना पुजतात. अरे ज्या आई-वडिलांनी आपल्याला इथपर्यंत आणलं त्यांची पूजा ह्या एका दिवसासाठी का करायची. मग त्यांची पूजा तर रोज केले पाहिजे. तेव्हाच तर गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ राहील.
आई वडील हे सद्गुरु आहेत. ते कल्पतरू आहेत. तुमच्याच्यानी जेवढं जमेल तेवढी सेवा करा. फक्त एकच विनंती आहे की, आई-वडिलांचे मन कधीच दुखवायचं नाही. सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की, स्वतःच्या आधी आई-वडिलांचे विचार करा. आणि स्वतःला भाग्यवान समजा की एवढे सोन्यासारखे तुम्हाला आई-वडील मिळाले.
आणि दुसऱ्या गोष्टीमुळे स्वतःमध्ये आणि आई-वडिलांमध्ये गैरसमज निर्माण नको करा. मित्रांनो आपलं जीवन खूप छोटसं आहे. कधी शेवट होईल सांगता येत नाही. आई-वडिलांशी बोला, त्यांच्या जवळ बसा आणि सगळे गैरसमज दूर करा. आणि एकदा त्यांच्या कुशीत जाऊन बघा तुम्हाला सोनं मिळेल.
कारण मला सोनं माझ्या आई वडिलांच्या कुशीत मिळाल म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि म्हातारपणात आई-वडिलांची जेवढी जमेल तेवढी सेवा करा. पुण्य मिळतील. आई वडिलांना जपा.
आणि शेवटचं सांगते, आई-वडिलां मुळे आपण इथपर्यंत आलो. आणि ते होते म्हणून आपण आहोत हे कधीच विसरायचं नाही.
पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छ…

लेखिका कु.सिद्धी ज्योत्स्ना भास्कर बन्सोड
कुरखेडा, जि.गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here