prabodhini news logo
Home कुरखेडा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – “गुरू हे आयुष्याचे दिशादर्शक”

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – “गुरू हे आयुष्याचे दिशादर्शक”

0
129

“गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा” अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखविणाऱ्या गुरूंचे आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस. भारतीय संस्कृती असे मानते ज्याला गुरु नाही त्याला गती नाही. म्हणूनच पहिला नमस्कार गुरुला करावा. गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण आणि पूजन करायची प्रथा आपण आजही पाहतो…… गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवसाला ‘ व्यासपौर्णिमा ‘असेही म्हणतात आपल्याला ज्ञान देतो, सन्मार्ग दाखवितो तो गुरु ‘श्रीकृष्ण- अर्जुन, द्रोणाचार्य-एकलव्य, रामकृष्ण परमहंस-विवेकानंद धौम्यऋषी- आरुणी’ अशा काही गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, आकार देणाऱ्या, प्रत्येकाच्या गुरूंना माझा शतशः नमन …! सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!!
मनुष्याच्या जीवनात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांच्या जीवनात गुरुची कमतरता आहे. तो व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही…..! कारण मनुष्य देहाला योग्य दिशा दाखविण्यासाठी गुरूचा मोठा वाटा असतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मनुष्य देहाला गुरुची गरज भासत असते. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्यांची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. गुरु विषय प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी, गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मांतर गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुचे अस्तित्व हे प्रत्येकांच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. आपले पहिले गुरू म्हणजेच आपली ‘जननी आई’ तिच्याकडून लहानपणीच आपल्याला अनेक गोष्टीचे बाळकडू पाजले जातात. भविष्यात आपल्याला समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीचे ज्ञान ही “आई रुपी गुरू ” आपल्याला देत असते, दुसरे गुरु म्हणजे आपले वडील, ते आपले आधारस्तंभ असतात. आपल्या आयुष्यात खऱ्या खोट्याची महती पटवून देतात. आई-वडील हे दोन्ही गाडीच्या चाकाप्रमाणे आपल्या जीवनाला आकार देतात. आपल्या जीवनातील तिसरे गुरु म्हणजे आपली धरणी माता…. तिच्यासोबत आपण खेळलो, बागडलो, तिच्यापासून खूप काही शिकलो. आणि चौथे गुरु आपले शिक्षक ज्यांनी आपल्याला ज्ञानाचा भंडार उघडून दिले. आणि पाचवे गुरु म्हणजे अध्यात्म होय…. त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ कळला जर या पाचही गुरूच्या आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर राहिले तर जीवन सफल होते.आणि आपल्या जीवनाचे उद्धार देखील झाल्याशिवाय राहणार नाही. एका दृष्टांताद्वारे सांगायचे झाले. तर ” गुरु बीन ज्ञान कहा से लावू ” हे वाक्य अगदी बरोबर आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. गुरु आपल्यातील निर्गुण ओळखून चांगले गुण शिकवितो. तो चांगल्या मार्गाने जाण्यास शिकवतो. खरंतर गुरुला ‘सृष्टीकार’अशी ही उपमा दिली आहे. या जगात सृष्टी निर्माण करण्याची ताकद फक्त एका गुरुमध्ये असते. जीवनामध्ये गुरूंना जेवढे महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व सद्गुरुलाही आहे. ‘सद्गुरु’ म्हणजे मानव जातीला आध्यात्मिक मार्ग दाखविणारा, भक्तांना मोक्ष देणारा,परमार्थ दाखविणारा सद्गुरु यांनाही आपल्या आयुष्यामध्ये गुरु एवढे स्थान आहे.

लेखिका सौ.ज्योत्स्ना भास्कर बन्सोड
कुरखेडा, जि.गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here