prabodhini news logo
Home ठळक बातम्या मनिषा तिरणकर यांचा सह हृदयी सत्कार

मनिषा तिरणकर यांचा सह हृदयी सत्कार

0
144

प्रशांत रामटेके संपादक – यवतमाळ – आ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मा.मनिषा तिरणकर यांचा पोलिस हक्क संघटनेच्या विदर्भ विभागीय महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल क्रांतिकारी सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी सेवाभावी न्यास यवतमाळच्या वतीने दि. ०९ जुलै २०२५ ला भव्य सत्कार करुन त्यांना सन्मानित करण्यात करण्यात आले ले आहे.
मनिषा तिरणकार ह्या दलित, आदिवासी, बहुजन सर्वहारा वर्गाच्या कष्टकरी माणसांची हक्काची लढाई रस्त्यावर उतरून लढत असतात, महिला, युवा, विद्यार्थी, बालकं च्या मुलभूत हक्काचे संरक्षण करण्यासाठी सुध्दा त्या लढत असतात.त्यांच्या या क्रांतिकारी कृतीची दखल घेऊन स्थानिक, राज्य, आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. याच कळीला धरुन आणि सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, कार्याचा आढावा त्यांच सहृदयी सत्कार करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे अध्यक्ष राहुल बीसणे हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून डवले साहेब,, अशोक भेंडाळे, राजेंद्र जाधव, क्रांती दूत सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी सेवाभावी न्यास चे संस्थापक अध्यक्ष विजय ढोके,दिनकर चौधरी रिटायर्ड झालेली पोलिस कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे.
कारेक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर सवाने यांनी तर आभार नरेंद्र इंगोले यांनी मानले आहे.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी क्रांती दुत संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here