
चंद्रपुर – 2 जुलै रोजी इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरचा नवनिर्वाचित सदस्य अर्चना उचके आणि सचिव हिमानी गोयल यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला यावेळी माजी अध्यक्ष सुचिता जेऊरकर यांनी 2025 -2026या वर्षासाठी नवयुक्त अध्यक्ष अर्चना उचके यांच्याकडे क्लबचा पदभार सोपवला सोबतच नव्या कार्यकारिणी हिमानी गोयल ;पल्लवी तेलंग ;अनघा आल्याडवार, स्मिता खांडरे ,मनीषा लांबट, कविता झाडे यांचा समावेश केला आहे. अर्चना उचके तथा नवनियुक्त कार्यकारिणींना सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी अर्चना उचके यांनी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.















