prabodhini news logo
Home घुग्घुस स्मृतीप्रित्यर्थ पंचशील बौद्ध विहार घुग्घुस बांधकामास विस हजार रुपये दान

स्मृतीप्रित्यर्थ पंचशील बौद्ध विहार घुग्घुस बांधकामास विस हजार रुपये दान

0
103

प्रशांत देशपांडे ब्यूरो चिफ – घुग्घुस – आज दिनांक 10/07/2025 रोजी गुरु पौर्णिमाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने पंचशील बौद्ध विहाराचे नवनवीत बांधकाम सुरू असुन या बांधकामाला स्मृतीशेष – संध्या सुरज लोहकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 10000/- दहा हजार रुपये व स्मृतीशेष – विशाल भारत लोहकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 10000/- दहा हजार रुपये असे एकूण वीस हजार रुपये . किरण दुधगवळी राहणार भालर यांनी आपल्या भाऊ व वहिनी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथील विहार बांधकामास दान दिले.
भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, कार्याध्यक्ष चंदगुप्त फकरू घागरगुंडे, यांनी आखलेली संकल्पना वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, तिसरा दिवस, गृह प्रवेश स्मृती दिवस साजरा न करता किंवा कमी खर्च करता तो पैसा समाजाला दान दिला तर तो पैसा योग्य ठिकाणी लावुन समाजाला आपण घडवु शकतो. अशी संकल्पना अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंदगुप्त फकरू घागरगुंडे, यानी आखलेली असून या संकल्पनेला आता हळूहळू नागरिकांन मध्ये जागरुकता व प्रसारीत होत आहे.
सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे चंद्रगुप्त फकरू घागरगुंडे यांनी किरणताई दुधगवळी यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here