prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरु पौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरु पौर्णिमा

0
115

करू सुरुवात
सदगुरु पूजनेनं ,
चरण स्पर्शांनं
येई मज ज्ञान. ॥१॥

ज्याच्या ह्रदयात
वसे गुरु भक्ती,
संस्कार ज्ञान ज्योत
संचारे येई शक्ती. ॥२॥

गुरु वाणी गोड
करण्याची ओढ,
अज्ञान नाहीसे
ज्ञान ज्योत अजोड. ॥३॥

गुरु जया पाठी
त्यास नसे चिंता,
गुरु आशिषाने
मिटे सारा गुंता. ॥४॥

गुरु असा असावा
जणू सुखाची सावली,
ज्यानी ज्ञान ज्योत पेटवली
वाहू तयाना पुष्पांजली. ॥५॥

श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे
कामोठे, नवी मुंबई, ता. पनवेल जि. रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here