
गुरु म्हणजे माय- बाप…
नाव घेता हरते पाप…
गुरु म्हणजे ज्ञान…
गुरु म्हणजे मान…
त्यांच्यामुळे मिळे या जगी सन्मान…
गुरु म्हणजे मथुरा-काशी
सर्व तीर्थाचे पुण्य त्यांच्या चरणापाशी
थोडक्यात एकच सांगतो
ज्यांच्यामुळे आयुष्यात यशाची वाटचाल होते सुरु…..
अशा प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीशी उभा असतो गुरु…
शिक्षण म्हणजे अमृताचा झरा…
आदर्श जिवन बनविणारा गुरु म्हणजे रत्नजडीत हिरा….
कदाचित वेळप्रसंगी बोलेल तो कटू बोल…..
पण गुरुविना आयुष्याला काही नाही मोल
कवी : शिवप्रसाद शेळके
ओझर मिग ता. निफाड जि. नाशिक














