
काळजातील स्पंदने
जागवतात स्वप्न आशा
जिद्दीने वाट काढणारी
शिकवितात यशाची भाषा
स्पंदनात असते लहर
जीवन जगण्याची
अंतर्मनातून उठून
स्वप्नांसाठी झगडण्याची
भावना व्यक्त होण्यासाठी
स्पंदने मनी तरंगतात
भविष्याला सांभाळीत
जगण्याला आधार देतात
थांबू नको वाटेत
अविरत चालत राहा
स्पंदनांना जाणिवेत भरून
आनंद जीवनी वाहा
स्पंदन म्हणजे सकारात्मकता
जी प्रत्येक मनात राही
क्षणभंगुर जीवनाकडे
नव्या उमेदीने पाही
स्पंदन भावभावनांचे
रडवतात कधी हसवतात
आदर्शवादी विचारातून
भविष्य आपले घडवतात
डॉ. स्मिता गजभिये/ तिरपुडे
लाखनी,जिल्हा.भंडारा















