prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – खारुताई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – खारुताई

0
131

इवलीशी खारुताई
शेंगदाणेही खाते
उंच उंच झाडावर
मस्त फिरून येते।।१।।

मनाने निर्मळ ती
नाहीच खोटा भाव
आपल्याच स्वप्नांचा
सजवते सूंदर गाव।।२।।

डायनासोर काळातील
आहे तीच खारुताई
चपळ ती आहे फार
पळत राहते घाई घाई।।३।।

उंच उंच झाडावर
तिचे घरटे आहे सूंदर
कापसाचा गोळा घेऊन
पळते लवकर लवकर।।४।।

झाडा झुडपात ती
सगळीकडे राहते
टुकूटूकू डोळ्याने
मजकडेच पाहते।।५।।

धिटुकली पिटुकली
आहे ती खारुताई
आनंदाने सगळीकडे
मजेत फिरत राही।।६।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here