
विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते आ.विजय वडेट्टीवारांची प्रमुख उपस्थिती
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात मागील १० वर्षांत विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरीच्या विकासासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा करून क़ोटी रुपयांचा निधी खेचून आणत ब्रम्हपूरीचा
झपाट्याने विकास केला आहे. सोबतच ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान गावात देखील आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात विकासकामे पार पडली आहेत. त्यामुळे विकासकामांनी प्रभावित होऊन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चौगान येथील भाजपच्या अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सदर पक्षप्रवेश विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, जिल्हा काॅंग्रेस सहसचिव आशिष गोंडाणे, श्रीहरी देवगडे, उमेश भुरके यांची उपस्थिती होती.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये पुरुषोत्तम नन्नावरे, संजय नन्नावरे, दीपक नन्नावरे, प्रभाकर नन्नावरे, नंदकिशोर नन्नावरे, शाळिकराम धरत, प्रमोद मैंद, सुभाष खरकाटे, मुखुर दवे, युवराज आरोटे यांचा समावेश आहे.















