prabodhini news logo
Home कोपरगाव प्रथम महिला माजी आमदार स्नेहलता बिपिन कोल्हे सप्ताह निमित्त मायगाव देवी येथे...

प्रथम महिला माजी आमदार स्नेहलता बिपिन कोल्हे सप्ताह निमित्त मायगाव देवी येथे भेट

0
107

कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे अखंड हरिनाम सप्ताह चालू असून सप्ताह हा अंतिम टप्प्यात आहे त्यादरम्यान कोपरगाव तालुक्यातील प्रथम महिला माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी भेट दिली . भेटीदरम्यान त्यांनी गावातील सर्व तरुण वर्ग व महिला भगिनी यांचे आभार मानले धार्मिक कार्यात मायगाव देवी हे गाव तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे असे संबोधित केले. ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. आमदार ताई यांच्या हस्ते कीर्तनाकरिता ज्या महिला सेवेकरी आल्या होत्या त्यांचा सत्कार करण्यात आला. या गावचे विशेष म्हणजे सप्ताहामध्ये सातही दिवस कीर्तन सेवा अन्नदान सेवा रोज केली जाते. आमदार ताई यांच्या हस्ते आजच्या सप्ताह चे सेवेकरी किर्तन सेवा ही मच्छिंद्र दामू भवर तसेच अन्नदान सेवा करी रावसाहेब पंढरीनाथ जगताप यांचे सत्कार करण्यात आले. आमदार ताई यांनी असे म्हटले की, गावाच्या धार्मिक व विकास कामांमध्ये असा एकोपा राहिला पाहिजे त्यामध्ये मायगाव देवी हे गाव सर्व गुणसंपन्न आहे. तसेच गावासाठी काही अडीअडचणी असतील तर गट तट सर्व सोडून माझ्याबरोबर चर्चा करावी असेही त्यांनी म्हटले, आगामी काळात नवरात्र उत्सव येत असल्याकारणाने मायगाव देवी मध्ये येण्यासाठी रस्त्याची फार दयनीय अवस्था झाली आहे तो रस्ता कशा पद्धतीने तयार करता येईल यासाठी मी स्वतः माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांना फोन करून सांगेन आपण त्यांना मतदान केले आहे काम करून घेणे हे आपलं कर्तव्य आहे असे उद्गार माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी सप्ताह भेटीदरम्यान केले. मायगाव देवी हे गाव धार्मिक गोष्टींमध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये उच्च स्तरावर असून अशा कार्यक्रमांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन कार्यक्रम पार पाडतात ही गोष्ट अभिमानास्पद आहे असे उद्गार त्यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here