
जिल्हा सचिवपदी वासु सोंदरकर, जिल्हा सहसचिवपदी आशिष गोंडाणे, मोहम्मद गाजी पटेल तर शहर सरचिटणीसपदी पराग बनपुरकर यांची नियुक्ती
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपुरी तालुक्यातील काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पक्षांतर्गत विविध संघटनात्मक पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहेत.
यामध्ये चंद्रपूर जिल्हा काॅंग्रेस कमीटीच्या सचिवपदी वासु सोंदरकर, जिल्हा सहसचिवपदी अॅड.आशिष गोंडाणे, जिल्हा सहसचिव पदी मोहम्मद गाजी पटेल तर ब्रम्हपूरी शहर सरचिटणीसपदी पराग बनपुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज्याचे विरोधी माजी पक्षनेता, विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.
काॅंग्रेस पक्षाचे विचार व ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने कार्य करावे असे आवाहन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी केले आहे.
नियुक्तीपत्र प्रदान करतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी नगरसेवक मनोज कावळे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवी पारधी, वकार खान, ईनायत खाॅ पठाण, ईकबाल जेसानी, प्रकाश खोब्रागडे, लक्ष्मण जिभकाटे, रवि पवार यांसह अन्य काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.















