
रविंद्र मैंद ब्रह्मपुरी-तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रह्मपुरी तालुका अखिल कुणबी समाज आणि मित्र परिवारातर्फे शनिवार दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी कोणता दिन क्रांती दिन आणि रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून नागभीड ते ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्गावर पडलेले मोठे मोठे खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली असून या उपक्रमातून अनेक वाहन चालकांना यापासून दिलासा मिळणार आहे.
ब्रह्मपुरी शहर आरोग्य नगरी आणि शैक्षणिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या तालुक्यातून नागरिक विविध कामकाजासाठी ब्रह्मपुरी ला येतात. मात्र ब्रह्मपुरीला ये जा करत असतांना राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. सदर खड्ड्यामुळे दिनांक ८ ऑगस्ट रोजी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थाना समोरील रोडवर अपघात घडला. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुका अखिल कुणबी समाज संघर्ष समितीने वेडीच लक्ष केंद्रित करून स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजवण्याची मोहीम हाती हा घेतली आहे. त्यामुळे आता बुजवलेल्या खड्ड्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रकाश धोटे,अविनाश राऊत, अनिल दोनाडकर, जगदीश तलमले, राजू उरकुडे, मनोज वझाडे,नोगेश बगमारे, राजेश पारधी, प्रेमलाल धोटे, यांच्यासह अखिल कुणबी समाज संघर्ष समितीचे युवक प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते..















