prabodhini news logo
Home चंद्रपूर मनपा शाळांमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा

मनपा शाळांमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा

0
106

चंद्रपूर 11 ऑगस्ट – पीएम श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच इतर सर्व मनपा शाळांमध्ये जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या या दिनाचे औचित्य साधून समूह नृत्य सादर केले. तसेच शाळेतील बागेत वृक्षारोपण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक नागेश नित यांनी बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या या दिवसाचे महत्त्व समजावून सांगीतले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी भूमिका निखाडे व आभार प्रदर्शन रिंपा मजुमदार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here