prabodhini news logo
Home चंद्रपूर “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत राष्ट्रध्वजावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न

“हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत राष्ट्रध्वजावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न

0
123

चंद्रपूर – 11 ऑगस्ट – हर घर तिरंगा अभियान अंतर्गत राष्ट्रध्वजावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा मनपाच्या सर्व शाळांमध्ये घेण्यात आली. या राष्ट्रीय अभियान निमित्ताने इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
भारताच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास, रंगांचे महत्त्व, ध्वजाचे नियम आणि विविध ऐतिहासिक घटनांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान अधिक दृढ होण्यास मदत झाली.
प्रत्येक वर्गातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून शिक्षकांनी निःपक्षपाती आणि अचूक परीक्षण केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मुख्याध्यापक वर्ग, शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here