
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर:- जेष्ठ नागरिक संघ, सभागृह, चंद्रपूर येथील भव्य मंचावर सांगितिक क्षेत्रातील दिवंगत दिग्गज गुरुवर्यांना एकाच मंचावरून श्रद्धांजली देण्यासाठी चंद्रपूर येथील स्थानिक कलाकारांचे वतीने नुकतेच संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिवंगत गुरुवर्य तबला विभूषन उस्ताद बाबासाहेब मिरजकर, सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी, मान. साहेबराव तसरे गुरूजी, मान. गजेंद्र पवार गुरुजी, मान. पांडुरंग जी कुंभारे गुरुजी, मान. मुरलीधर पवार गुरुजी,
मान. उत्तम गिरी गुरुजी, मान. हरिश्चंद्र प्रधान गुरुजी, मान. विश्वनाथ मत्ते गुरुजी,मान.गजाननराव वडगावकर गुरुजी,
मान. विनायकबुवा झाडे गुरुजी, मान. दत्तात्रय कसलीकर गुरुजी, मान.देवराव लाडसे गुरुजी, मान. गायधने गुरूजी, मान.दशरथ राजगडे गुरुजी, मान. जयराम पिल्ले गुरुजी, मान. राजू कासलीकर गुरुजी यांचे प्रतिमेला माला अर्पण करून दिवंगत गुरुवर्यांना या प्रसंगी सर्वांचे उपस्थितीत मौन श्रद्धांजली अर्पण करून प्रमुख पाहुण्यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
या अविस्मरणीय सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. श्रीमान सुनील पुराणकर, मारोतराव मते अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर, डॉ. भानुदास दाभेरे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर तथा श्रीमान किशोर बाबा जाधव संचालक, श्री. साई दरबार देवस्थान, चंद्रपूर याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वैष्णवी निमकर यांचे गुरुवंदना नृत्य ने करण्यात आली. संजय राजगडे यांनी राग शंकरा मधील शंकर भंडार बोल, एक ताल मधील बंदिश आपल्या सुमधुर आवाजातून सादर केली. नृत्यांगना नृत्य सादर करत असतांना तबल्याची साथ तितक्याच तयारीने सतीश दादा कवरासे यांनी केली.
श्रीमान मोरेश्वर मडावी यांनी (राग मेघ मल्हार) ताल झपताल व आडा चौताल अशा अवचट ताल मधील बंदिशी गाऊन सुमधुर आवाजातून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.. श्रीमान सतीश कवरासे यांनी अप्रतिम तबला साथ दिली. हार्मोनियम साथ दिलीप दातारकर यांची होती.
मंगेश देऊळकर यांनी एक नाट्यगीत व एक गीतरामायण मधील पद गाऊन आपल्या दिवंगत गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली. अप्रतिम तबला साथ श्रीमान तोडासे साहेब यांची होती तथा हार्मोनियम साथ श्रीमान सुधीर नाकाडे यांची होती.
श्रीमान विजय जांभेकर यांनी एक भजन व एक गझल सादर केली. यांच्या तबला साथीला श्री सतीश कवरासे तथा हार्मोनियम साथीला दिलीप दातारकर होते. नंदकिशोर महले यांनी एक उत्कृष्ठ गीत सादर केले त्यांना तबला साथ सुधीर मांधडे यांनी तर हार्मोनियम साथ श्रीमान मोरेश्वर मडावी यांनी केली. रविकांत राठोड यांनी आपल्या भारदस्त आवाजात गुरू परमात्मा परशू हे गीत सादर केले.. सुधीर मंधाडे यांनी उत्कृष्ठ अशी तबला साथ दिली.
लोमेश पिल्लेवार यांनी अप्रतिम गीत गाऊन आपली सेवा रुजू केली. कानकाटे यांनी उत्कृष्ठ तबला साथ दिली. पुजा महले यांनी पिया बावरी हे तीन रागातील मिश्रण असलेल गीत उत्कृष्ठ रित्या सादर केलं. उत्कृष्ठ तबला साथ श्री सतीश कवरासे यांची होती. उत्कृष्ठ हार्मोनियम साथ श्रीमान संजय राजगडे सर यांनी केली. शोभिनी हिने आपल्या सुमधुर आवाजातून उत्कृष्ठ गीत गाऊन आपली सेवा रुजू केली. श्रीमान तोडासे साहेब यांनी मने धुंद वेळी भिजून रात्र गेली हे सर्वांच्या आवडीच गीत सुंदर रित्या गाऊन रसिक श्रोत्यां कडून वन्स मोअर मिळविला. उत्कृष्ठ तबला साथ श्रीमान निलेश बर्दालकर यांची होती. कुमार अथर्व कवरासे यांनी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांनी संगीत बद्ध केलेलं राग पुरियाधनश्री मधील सकल कर ताज सरस्वती माता हे गीत आपल्या सुमधुर आवाजातून सादर केले. तबला साथ मधुकर जथाडे यांची तर हार्मोनियम साथ सतीश कवरासे यांची होती. राजेश धोंगडे यांनी सुध्दा आपल्या सुमधुर आवाजातून बहारदार गीत सादर केले. उत्कृष्ठ तबला साथ श्री अमोल दुधलकर तथा हार्मोनियम साथ श्री मोरेश्वर मडावी सर यांची होती.श्रीमान संजय राजगडे सर यांनी हे सुरांनो चंद्र व्हा हे नाट्यगीत व ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ही मराठी गझल आपल्या सुमधुर आवाजात अप्रतिम रित्या सादरीकरण केले.. गाण्याला पोषक अशी तबला साथ सतीश कवरासे यांची होती. कार्यक्रमाचे शेवटी पूणे हून खास या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आलेले नवोदित कलाकार मोहित पुराणकर यांनी आपल्या बासरी वादन मध्ये राग यमन विलंबित एकताल व द्रुत तीनताल मध्ये बंदिश सादर केली. चोखेश्वर नाकाडे यांनी यावेळी उत्कृष्ठ रित्या तबला साथ दिली.दोन्ही नवोदित कलाकार हे चंद्रपूर येथील रहिवासी आहेत हे मात्र विशेष! कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कवरासे यांनी केले. रिद्धी राऊत (दरने) यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्वश्री संजय राजगडे, तोडासे, मधुकर जथाडे, सुधीर नाकाडे, दिलीप दातारकर, सतीश कवरासे, नंदकिशोर महले, राजेश वाळके, निलेश भरडाळकर, अभय येदनुर्वार, लोमेश पोतराजे, विजय जांभेकर, संजय नासिरकर, सुधीर मांधडे, किशोर कानकाटे, मोरेश्वर मडावी, वैष्णवी निमकर, रिद्धी राऊत, रविकांत राठोड, मंगेश देऊळकर, राजेश धोंगडे, गाठे, ॲड. सुनिल पुराणकर साहेब यांनी सहयोग दिला. दिवंगत गुरुवार्यांना एकाच रंगमंचावरून चंद्रपुरातील सर्व शिष्य वर्गां मार्फत संगीतमय श्रद्धांजली देण्यात आल्याने चंद्रपूर चे इतिहास मधील पहिला अविस्मरणीय उपक्रम ठरला असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.















