
वाहून घेऊ धार्मिक सामाजिक कार्यक्रमात
गुरु, मायपिता, मायभूमी स्मरू उपकारास
जगनियंत्याचे मानू उपकार घातले जन्मास
निर्गुण निराकारी मने करू साजरा वाढदिवस
प्रशांत दादा, तुमच्या प्रोत्साहनाने मिळते
प्रेरणा लिखाणाची आम्हां सारस्वतांना
असेच लाभो उदंड आयुष्य न् यश, किर्ती
शतशः शुभेच्छा तुम्हांस सहर्षे करुनी गुरुवंदना
(स्वरचित)
नीला चित्रे
चिंचवड पुणे














