
प्रशांत सर यांना देते
वाढदिवसाच्या शुभेच्छा
परिपूर्ण होवोत तुमच्या
मनातील सर्व इच्छा.(१)
लाभू दे निरोगी निकोप
उदंड अमृतमयी जीवन
तुमचा प्रेरक सहवास
आम्हा साठी संजीवन.(२)
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधी
तुमच्या रुपे सुपुत्र जन्मा आला
राजकारण,समाजसेवेचा वसा
कार्यातून मनोमनी जपला.(३)
तडफदार लेखणीतून तुम्ही
देता जनतेला न्याय
हक्कांची देता जाणीव
दूर करीता अन्याय.(४)
तुमचे अनमोल कार्य
पुरस्कारांनी सजले
ग्लोबल फाउंडेशन या
पुरस्काराचे भाग्य लाभले.(५)
प्रबोधिनीच्या अंकातून मिळते
नव साहित्यिकांना स्फूर्ती
माय मराठीची त्यामुळेच
दिगंतरात पसरे किर्ती.(६)
अलौकिक कार्य घडावे
त्यासाठी उदंड आयुष्य लाभावे
हीच आमच्या मनीची आस
प्रबोधिनी साठी दिवस खास(७)
अंजली गरगटे.(पुणे)














