prabodhini news logo
Home क्राईम चंद्रपुरात अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना अटक

चंद्रपुरात अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना अटक

0
104

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर LCB यांनी केलेल्या धाडसी कारवाईतून अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना अटक करून तब्बल १,५८७ कि.ग्रॅ. गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल असा मिळून एकूण १,७४,०३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे वतीने दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत नियमित पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, काही इसम अवैधरित्या गांजाची वाहतूक करणार आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बंगाली कॅम्प परिसरात सापळा रचला. सापळ्यादरम्यान संशयास्पद स्थितीत येत असलेली मोटारसायकल (क्रमांक MH-34-6956) अडविण्यात आली. पंचासमक्ष वाहन चालक व मागे बसलेल्या व्यक्तीची तपासणी केली असता, त्यांच्या जवळील बॅगेत १,५८७ कि.ग्रॅ. गांजा आढळून आला. अवैध देशी – विदेशी दारूचा साठा जप्त

या कारवाईत दिपक राजू भोले (वय २१ वर्षे) व बिश्वजीत बिमल सिकद्दर (वय ३२ वर्षे) दोन्ही रा. शांतीनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक ६७२/२०२५ कलम ८ (क), २०(ब) (ii) अन्वये, एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. घरफोडी, मोटरसायकल चोरी, दोघे अटकेत
यसदर यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. विनोद भुरले, पो.उप.नि. सुनील गौरकार, पो.ह.वा. सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, पो.अं. किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चा.पो.ह.वा. प्रमोद डंभारे, तसेच गजानन मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here