prabodhini news logo
Home चंद्रपूर चौगान–बेटाळा मार्गावर नाल्याला भगदाड; प्रशासनाचे दुर्लक्ष

चौगान–बेटाळा मार्गावर नाल्याला भगदाड; प्रशासनाचे दुर्लक्ष

0
145

सुरक्षित पुलियाची मागणी निधी मंजूर करून काम युद्धपातळीवर सुरू करावे

ब्रह्मपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : सततच्या मुसळधार पावसामुळे चौगान–बेटाळा मार्गावरील नाल्याला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला असून वाहतूक धोकादायक बनली आहे,चार चाकी वाहनांना जास्त धोकादायक ठरत आहे, चौगान येथे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांना ये जा करावे लागते,विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.

स्थानिकांनी तातडीने वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. नागरिकांनी सुरक्षित पुलिया उभारण्याची, तसेच बॅरिकेड्स, चेतावणी फलक व प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी केली असून हा मार्ग दैनंदिन प्रवास,शेती व्यवसाय व विद्यार्थी वाहतुकीसाठी महत्वाचा दुवा असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी पुलिया बांधण्याचा निर्णय तातडीने घ्यावा , आवश्यक निधी मंजूर करून काम युद्धपातळीवर
सुरू करावे अशी नागरिकांची मागणी आहे.
मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here