prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपुरी तालुक्यातील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी केला काॅंग्रेस पक्षात प्रवेश

ब्रम्हपुरी तालुक्यातील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी केला काॅंग्रेस पक्षात प्रवेश

0
252

विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला पक्षप्रवेश

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज

सध्या देशभरासह राज्यात देखील महागाईने कळस गाठला असुन सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल आता काॅंग्रेसकडे वाढलेला दिसून येत आहे

महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकाळात सुरु असलेला ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील विकास बघता मोठ्या प्रमाणात ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील नागरिक सुखावले असुन काॅंग्रेस पक्षाला समर्थन देत आहेत. ब्रम्हपूरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय विभागांच्या सर्व सोयीसुविधा युक्त नवीन इमारती उभ्या झाल्या आहेत. तर अनेक विकासकामे निर्माणाधीन आहेत. या सर्व विकास कामांमुळे प्रभावित होऊन व विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान, मालडोंगरी, पारडगाव, हळदा येथील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये चौगान येथील मधुकर तोंडरे, रामचंद्र भागडकर, सोमेश्वर बुराडे, केवळराम नन्नावरे, अतुल राऊत, विशाल उरकुडे, खेमराज चौधरी, गणेश बूराडे तर मालडोंगरी येथील विलास घाटबांधे, अन्नाजी चौधरी, रवी ठाकरे, स्वप्नील नागमोती, आकाश बरडे, प्रवीण कुत्तरमारे, सोमेश्वर निहाटे, गोपाल समर्थ, सौरभ पिलारे, जनता ठेंगरी, राकेश चौधरी, विक्रम लांजेवार, प्रतिक चौधरी, मयुर चौधरी तर पारडगाव येथील वैभव तलमले, श्रीदेव ठेंगरी, सागर मेश्राम, मकरंद तुपट, देवा बगमारे, दिलीप पारधी, अनुराग तुपट, शरद तुपट, प्रफुल ठेंगरी, प्रमोद भुसारी, भागवत भर्रे, निकेश तोंडरे, भाविक तोंडरे, प्रशांत भुसारी तर हळदा येथील रुपेश भोयर, भानुदास भोयर, तानबा गेडाम, धनराज घोडमारे, किशोर भोयर यांसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here