prabodhini news logo
Home गोंदिया जाती दावा पडताळणीचे प्रस्तावात असलेल्या त्रुटीबाबत विशेष मोहिम

जाती दावा पडताळणीचे प्रस्तावात असलेल्या त्रुटीबाबत विशेष मोहिम

0
130

गोंदिया प्रतिनिधी- दि.19 : सन 2025-26 या शैक्षणीक वर्षात सीईटी, जेईई, नीट यासारख्या प्रवेश पात्रता प्रक्रियेमधून व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षीत प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले जाती दावा पडताळणीसाठी प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे सादर केलेले असून दि.4 ऑगस्ट 2025 पर्यंतचे अर्जदारांचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत, परंतु ज्या अर्जदारांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाहीत त्यांना त्यांचे ई-मेल आयडीवर, फोनद्वारे, पत्राद्वारे त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत त्यांनी गुरुवार दि.21 ऑगस्ट 2025 रोजी त्रुटी पुर्तता करण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि.10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 21 नोव्हेंबर 1961 तसेच इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 13 ऑक्टोबर 1967 च्या पूर्वीचे वा त्या तारखेस त्यांचे कुटुंबियांचे तसेच गोंदिया जिल्ह्याचे सर्वसाधारण अधिवासाच्या आवश्यक त्या मुळ पुराव्यासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे दुपारी 12 वाजता उपस्थित रहावे. असे उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here