
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी – बल्लारपूर आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका च्या वतीने निर्धार बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे निर्धार केलाय की येत्या निवडणुकीमध्ये नगरपंचायत जिल्हा परिषद नगरपरिषद निवडणुका हे स्वबळावर लढण्याचे ठामपणे निर्धार केला आहे यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा वर्ग हा वंचित बहुजन आघाडीला हा बल्लारपूर शहरांमध्ये व तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आपण हे निवडणुका स्वबळावर लढवून जिंकण्याचे निर्धार केला आहे. तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना विदर्भ समन्वय भगवान बोंडे वंचित बहुजन आघाडी, विवेक हाडके विदर्भ समन्वय सदस्य वंचित बहुजन आघाडी, प्रा.सोमाजी गोंडाने जिल्हा अध्यक्ष पश्चिम चंद्रपूर, कविता गौरकार जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर, शुभम मंडपे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर युवा आघाडी, मधुकर उराडे जिल्हा महासचिव चंद्रपूर, सत्यभामा ताई भाले, जिल्हा ज्येष्ठ सल्लागार चंद्रपूर, उषा दुर्गे, जिल्हा ज्येष्ठ प्रवक्ता, सुप्रिया चंदनखेडे जिल्हा सचिव, रत्नमाला निरांजने जिल्हा संघटक, अश्विन शेंडे जिल्हा सदस्य युवा आघाडी मार्गदर्शक करण्यात आले तसेच तालुक्यातील इतर पदाधिकारी नम्रता साव तालुका अध्यक्ष बल्लारपूर महिला आघाडी, बेबीताई भडके तालुकाध्यक्ष मुल महिला आघाडी, रेखा पागडे शहराध्यक्ष बल्लारपूर महिला आघाडी, उमेश कडू शहराध्यक्ष बल्लारपूर, तसेच बल्लारपूर का तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी निर्धार केला आहे अपकी बार वंचित बहुजन आघाडी की सरकार येणारा निवडणुकीमध्ये तन-मन-धनाने निवडणूक लढण्यास कार्यकर्त्यांनी सक्षम निर्धार केला आहे.















