prabodhini news logo
Home ठळक बातम्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या – कैलास देशमुख गोरठेकर

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या – कैलास देशमुख गोरठेकर

0
102

उमरी तालुका प्रतिनिधी 19 उमरी तालुक्यात मागील तीन ते चार दिवसापासून झालेल्या लहरी पावसामुळे मोठ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे अनेक शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन तुर मुग उडीद या पिकाचे नुकसान झालेले आहे त्यांना आर्थिक मदत हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ देण्यात यावी असे निवेदन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक युवानेते कैलास देशमुख गोरठेकर यांनी तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदनाद्वारे केले आहे.
उमरी तालुक्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये सतत तीन चार दिवसापासून अतिवुष्ठी होत असून पावसाची तीव्रता वाढत गेलेली आहे त्याचा परिणाम पिकावर होऊन हाताला आलेल्या शेतकऱ्यांचे पीक पाण्याने खरडून पाणी साचुन गेलेले आहे अनेक नदीं नाल्यांना पूर येऊन त्याच बरोबर गोदावरी नदीची पाणी पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे तरी शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे. असे निवेदन देण्यात आले.
यावेळी राजीव पाटील ढगे तालुका अध्यक्ष,गणेशराव अनेमवाड,खुशाल पाटील, बालाजी पवार,श्रीनिवास कदम सदाशिव पालदेवाड, साईनाथ जमदाडे, शरद मदनवाड कसबे सरपंच राजेश खांडरे सदाशिव मंत्रीवाड यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here