prabodhini news logo
Home ठळक बातम्या मिरा-भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष व पहिले आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांचे निधन

मिरा-भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष व पहिले आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांचे निधन

0
150

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
8104170564
mojissports@gmail.com

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष व पहिले आमदार म्हणून कार्यभार सांभाळलेले माननीय श्री. गिल्बर्ट मेन्डोसा यांचे १८ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने मिरा-भाईंदर शहरासह संपूर्ण परिसराने एक खरा लोकनेता गमावला आहे.

गिल्बर्ट मेन्डोसा यांनी नगराध्यक्षपदावर कार्यरत असताना शहराच्या विकासासाठी मोलाची कामगिरी केली. पुढे आमदार म्हणून त्यांनी सामान्य नागरिकांच्या अडचणी मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात लोकसंपर्क, प्रामाणिकपणा व समाजसेवा या गुणांमुळे त्यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.

त्यांच्या जाण्याने मिरा-भाईंदर व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here