prabodhini news logo
Home भंडारा विशेष लेख – शासकिय ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे महत्व

विशेष लेख – शासकिय ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे महत्व

0
150

कलेतून स्वप्न साकार – जीवनाला मिळे आकार

“कलेला सीमा नसते आणि तिची किंमत अमूल्य असते.” आजच्या युगात कला आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालत आहेत. ड्रॉईंग ग्रेड परीक्षा (Elementary व Intermediate) ही केवळ चित्रकलेत रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर तंत्रज्ञान व IT क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठीसुद्धा एक महत्त्वाचे पाऊल आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मिळणारे प्रमाणपत्र शिक्षण, नोकरी व करिअरमध्ये अनेक फायदे देते.

१. शासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र

ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मिळणारे प्रमाणपत्र हे राज्य सरकारकडून मान्यताप्राप्त असते. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्याच्या सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्याचा पुरावा आहे.

२. दहावीच्या गुणांमध्ये वाढ (Incentive Marks)

दहावीच्या परीक्षेत (SSC Board) Elementary आणि Intermediate ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वाढीव गुण (Grace Marks) मिळतात.

हे गुण विद्यार्थ्यांच्या एकूण निकालात भर घालतात आणि मेरिट लिस्टमध्ये चांगले स्थान मिळवण्यास मदत करतात.अ श्रेणी पास.07 गुण, ब श्रेणी पास 05 गुण, क श्रेणी पास गुण 03

विशेषत: स्पर्धात्मक प्रवेश प्रक्रियेत (उदा. विज्ञान शाखेत किंवा डिप्लोमामध्ये प्रवेशासाठी) हे गुण महत्त्वाचे ठरतात.

३. IT व डिझाईन क्षेत्रातील फायदे

आज IT क्षेत्रात फक्त तांत्रिक ज्ञानच नाही तर डिझाईन थिंकिंग, UI/UX डिझाईन, अ‍ॅनिमेशन, गेम डेव्हलपमेंट, वेब डिझाईन यांसारख्या सर्जनशील कामांची मागणी आहे.

UI/UX डिझाईनमध्ये (User Interface & User Experience) कलात्मक विचार व रेखाटन कौशल्याची गरज असते. ड्रॉईंग ग्रेड प्रमाणपत्र यासाठी तुमची सर्जनशील पार्श्वभूमी मजबूत करते.
अ‍ॅनिमेशन व गेम डेव्हलपमेंट: ड्रॉईंग व स्केचिंगची पायाभरणी असल्यास IT क्षेत्रातील या कोर्सेसमध्ये प्रगती करणे सोपे होते.
ग्राफिक डिझाईन, वेबडेव्हलपमेंट: रंगसंगती, लेआउट व क्रिएटिव्ह आयडियाज समजण्यासाठी ड्रॉईंग ग्रेडचे शिक्षण उपयुक्त ठरते.

४. शैक्षणिक आणि व्यावसायिक फायदे

आर्ट व डिझाईन कॉलेजेसमध्ये प्रवेश: BFA, ATD,GD .Art, AM,आर्किटेक्चर, फॅशन डिझाईन, अ‍ॅनिमेशन कोर्सेससाठी हे प्रमाणपत्र विशेष गुण देणारे ठरते.
IT आणि डिझाईन फील्डच्या जॉब इंटरव्ह्यूमध्ये: क्रिएटिव्ह प्रमाणपत्रे असणे उमेदवाराला इतरांपेक्षा वेगळे ठरवते.
सरकारी शिक्षक भरती व इतर नोकरीसाठी: Intermediate, नंतर Atd (आर्ट टीचर डिप्लोमा ) कोर्स केल्यास आर्ट टीचर पदांसाठी अनिवार्य मानले जाते.

५. सर्जनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास

“कलेने मनाची क्षितिजे विस्तारतात.”
ड्रॉईंग ग्रेडची तयारी करताना विद्यार्थी निरीक्षणशक्ती, रंगांची जाण, कल्पकता, आणि बारकाईने विचार करण्याची सवय आत्मसात करतात. IT क्षेत्रातसुद्धा सर्जनशील विचारशक्ती व समस्या सोडवण्याची क्षमता महत्त्वाची ठरते.

६. स्पर्धात्मक परीक्षांसाठी पायाभरणी

NATA (आर्किटेक्चर), 80 मार्क चा आर्ट वर पेपर असतो आणि 120 मार्क बाकी विषयाचा पेपर असतो त्यामुळे 80 मार्कस मिळवणे drawing ग्रेड पास विद्यार्थ्यांना खूप सोपं जातं. CEED, NID किंवा अ‍ॅनिमेशनसारख्या प्रवेश परीक्षांमध्ये ड्रॉईंग ग्रेडचे कौशल्य थेट उपयोगी पडते.
“कला ही केवळ छंद नसून भविष्य घडवणारा पाया आहे.” ड्रॉईंग ग्रेड परीक्षा विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालात अतिरिक्त गुण मिळवून देते, IT आणि डिझाईन क्षेत्रातील संधी वाढवते आणि सर्जनशीलतेला नवे दिशा देते. म्हणूनच विद्यार्थ्याने ही परीक्षा देऊन आपले कौशल्य सिद्ध करावे.

लेखिका सौ. पुष्पा योगेंद्र काटेखाये
कला शिक्षीका
गांधी विद्यालय पहेला,ता.भंडारा, जिल्हा-भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here