prabodhini news logo
Home ठळक बातम्या अधिकारीच नाही, ग्रामसभा कशी होणार..

अधिकारीच नाही, ग्रामसभा कशी होणार..

0
134

राळेगाव तालुका प्रतिनिधी शैलेश आडे – राळेगाव गावातील विविध विकासकामे, योजनांची अंमलबजावणी तसेच लोकहिताच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेली ग्रामसभा अपूर्ण ठरली. कारण, ग्रामसभेला उपस्थित राहणे अपेक्षित असणारे अनेक अधिकारी अनुपस्थित राहिले.
शासन नियमानुसार ग्रामसभेला ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, कृषी सेवक, आरोग्य सेवक, शाळेचे मुख्याध्यापक, पाणीपुरवठा विभाग, विजतंत्री तसेच कायदा-सुव्यवस्थेसाठी बिट जमादार यांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक अधिकारी गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “आमच्या समस्या, विकासकामे व योजना याबाबत थेट जबाबदार अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचे असतात. पण अधिकारीच गैरहजर राहिले तर ग्रामसभा कशी फलदायी ठरणार?” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या गैरहजेरीबाबत संबंधित विभागांनी गंभीरपणे लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Box
ग्रामसभेला गैरहजर राहणे म्हणजे [ग्रामस्थांचा अपमान आहे.
अधिकारी गावकऱ्यांच्या समस्या ऐकायला तयार नसतील तर विकास कसा होणार.
ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा आत्मा, त्याला कमी लेखणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई हवी.”
आमच्या गावात अधिकारीच येत नसतील तर योजनांचा लाभ कसा मिळणार?”]
युवा कार्यकर्ता
अमित ढोबळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here