prabodhini news logo
Home ठळक बातम्या तेलबिया प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान; अर्ज करण्याचे आवाहन

तेलबिया प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान; अर्ज करण्याचे आवाहन

0
134

यवतमाळ प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. 20 : राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात तंत्रज्ञान तेलघाणा तेलबिया उत्पादन वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण व क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तेल काढणी युनिट 10 टन क्षमता व इतर तेलबिया प्रक्रिया यंत्रसामग्रीसाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल 9 लक्ष 90 हजार पर्यंत अनुदान देण्यात येते. याकरिता इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी लाभार्थी शासकीय, खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी एफपीओएस,सहकारी संस्था असावी. केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे मूल्य साखळी भागीदार व्हीसीपीएस अटी व नियम प्रकल्पासाठी जमीन व इमारतीसाठी अनुदान मंजूर होणार नाही. निवडलेल्या लाभार्थ्याने संयंत्र खरेदी केल्यानंतर व त्याची मोका तपासणी झाल्यानंतरच तसेच प्रकल्प कार्यान्वित झाल्याची खात्री केल्यानंतरच अनुदानाची देय रक्कम लाभार्थ्याच्या थेट जमा केली जाईल.

CIPHET, लुधियाना किंवा तत्सम मान्यताप्राप्त संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल, मिनी ऑईल मिल, ऑईल एक्सपेल मॉडेल्सला सदरील अनुदान अनुज्ञेय राहील. कापूस बियाणे, वृक्षजन्य तेलबिया इत्यादी दुय्यम स्रोतांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प बँक कर्जाशी निगडीत असतील. अशा प्रकल्पांसाठी इच्छुकांनी नाबार्ड, ग्रामीण भंडारण योजना मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर पूर्वसंमतीनंतरच काम सुरू करावे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संयुक्त तपासणी अहवालावर आधारित अनुदानाची रक्कम जमा होईल.

इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांचे संपूर्ण प्रकल्प प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या कृषि अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात दिनांक ३१ ऑगस्ट पर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here