
ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – येथील ढिवर-भोई समाजातील महर्षी वाल्मिकी महिला व पुरुष बचत गटाच्या माध्यमातून जनता विद्यालय नागभीड येथील नुकतेच ३१जुलै २०२५ ला वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले सन्मानीय प्रभुजी वाघधरे आणि कृषक विद्यालय चौगान येथून सेवानिवृत्त सन्मानिय श्री.गोपालजी भानारकर यांचा सेवानिवृत्त सत्कार गौरव समारंभ दिनांक२०आगस्ट२०२५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय वाल्मिकी नगर ब्रम्हपुरी येथे उत्साहाने आयोजित करण्यात आला.
आगस्ट महिन्याची मासिक सभा तुकड्यादास चाचरकर व व्यंकटेश चाचरकर यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रभुजी वाघधरे यांनी जनता विद्यालय नागभीड येथे सहाय्यक शिक्षक म्हणून जवळपास३९ वर्षे प्रदीर्घ सेवा देवून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवून३१जुलै२०२५ला सेवानिवृत्त झाले. तसेच गोपाल भानारकर यांनी कृषक विद्यालय चौगान येथे शारीरिक शिक्षक तथा क्रीडा अधिकारी म्हणून योगदान देवून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या अनमोल योगदानाबद्दल भोई-ढिवर समाजातील बचत गटांच्या वतीने सेवापूर्ती कृतज्ञता सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्वप्रथम महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे विद्यिवत पूजन करून करण्यात आले. महर्षी बचत गटाचे अध्यक्ष नथुजी चांदेकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्रभुजी वाघधरे आणि गोपाल भानारकर यांना शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ भेटवस्तु देवून सपत्नीक स्वागत व सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून बचत गटांच्या महिला मंडळींनी श्रावण महिन्यातील मंगळागौरी पूजनाचे कार्यक्रम घेण्यात आला. मंगळागौरीचे पूजनानंतर सुंदर नृत्य सादर करून हळदकुंकू, उखाणे, फुगड्या आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बचत गटातील सदस्य श्री. हरीश कामडी,अनिल पचारे,संदीप भानारकर, अमोल भानारकर, आनंद शिवरकर,विजय दिघोरे, संजय दिघोरे, मनोहर मेश्राम, लक्ष्मण शेंडे, प्रविण चाचेरे,व्यंकटेश चाचरकर, तुकडोजी चाचरकर,रवींद्र अलगदेवे, प्रमोद दिघोरे, सुरेश दिघोरे, हेमंत अलगदेवे, रवी दिघोरे, गिरीधर सि़ंधीमेश्राम, महिला सदस्य माधुरी दिघोरे, रेखा कामडी, मंजू कामडी, सविता चाचरकर, वर्षा चाचरकर, सविता पचारे, वैशाली चाचेरे, अनिता भानारकर, मिनाक्षी मेश्राम, सुमित्रा वाघधरे, गायत्री शेंडे, विभा दिघोरे, रिध्दी मेश्राम, प्रतिभा शिऊरकर,वंदना अलगदेवे, वनिता दिघोरे, गायत्री शेंडे ग्रीष्मा दिघोरे कविता चांदेकर आदी सहकुटुंब कार्यक्रमास उपस्थित होते. शेवटी सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार व्यंकटेश चाचरकर सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बचत गटाच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.















