prabodhini news logo
Home ठळक बातम्या चंद्रपूर येथे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चंद्रपूर तर्फे मनपा आयुक्त यांना...

चंद्रपूर येथे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चंद्रपूर तर्फे मनपा आयुक्त यांना निवेदन

0
165

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी – संजय नगर दर्गा वार्ड चंद्रपूर येथील रस्ते दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची समस्या, नाल्या सफाईची समस्या, व इलेक्ट्रीक पोलवरील स्ट्रीट लाईट लावून देण्याची समस्या तातडीने सोडवण्याबाबत वार्डातील 20-25 महिलां सोबत महानगरपालिका चंद्रपूर येथे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात आले.
तत्पूर्वी आठ दिवसापूर्वी दर्गा वार्ड येथे कार्यकर्त्यासोबत दौरा करून तेथील समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. हा वार्ड अत्यंत दुर्लक्षित असून या वार्डाकडे नगरपरिषद ने जनतेच्या सुविधा कडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे येथील जनता समस्यांनी त्रस्त आहे. तसेच या वार्डात जाण्या येण्यासाठी एक नाला आडवा येत असल्यामुळे एम. इ. एल. च्या गेटमधून जनतेला जाणे येणे करावे लागते, व हे अंतर दोन ते तीन किलोमीटर आहे. त्यामुळे येथील जनतेने सदर नाल्यावर पुलिया बांधून मिळण्यासंबंधी विनंती केलेली आहे. वरील सर्व समस्यांचे निवेदन माननीय आयुक्त यांना देण्यात आले. व त्यांनी नाल्यासफाई, इलेक्ट्रिक पोल वरील स्ट्रीट लाईट दोन दिवसात लावून देण्याचे आश्वासन दिले. व बाकी समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यात येतील असे म्हटले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व नभा वाघमारे, जिल्हाध्यक्ष महिला विंग व महेंद्र खंडाळे जिल्हाध्यक्ष पी पी आयडी चंद्रपूर तसेच संगीता कोडीवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here