
चंद्रपूर मनसे जनहित कक्ष विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय तुरक्याल यांचे वाहतूक नियंत्रण अधिकारी यांना निवेदन
लवकरात लवकर समस्या सोडण्यात यावी; अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल
किशोर मडगुलवार जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्याच्या आजू बाजूला किंव्हा शहरातील गल्ली बोड्यात असणारे बार चालक रेस्टॉरंट चालक वाईन शॉप चालक ह्यांना पार्किंग ची व्यवस्था करणे अनिवार्य असताना हा उत्पादन शुल्क विभाग ह्यांच्या तर्फे प्रत्येक बार चालक, वाईन शॉप चालक ह्यांना मद्य विक्रीचे लायसन्स देताना ह्या सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात पण हे सर्व चालक मालक ह्या नियम पायदळी तुडवून आपल्या मर्जीने मनमानी करून राहिले आहेत त्यामुळे शहराच्या मुख्य मार्ग असो की गल्लो गल्ली त्यांच्या कडे पार्किंग ची व्यवस्था नसल्याने ट्रॅफिक जाम ची समस्या निर्माण होते आणि सर्व सामान्य जनतेला ट्रॅफिक जाम मुळे नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधी विभाग चंद्रपूर तर्फे मोठ मोठे रेस्टॉरंट चालक प्रत्येक सर्व आस्थपनांना इशारा आहे की त्यांनी आपली आपली पार्किंग ची व्यवस्था करून ट्रॅफिक जाम ची जी स्थिती संपूर्ण शहरात उद्भवते ती समस्या सोडवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधी विभाग चंद्रपूर आपल्या स्टाईल ने सर्व समस्या सोडवण्यास बाध्य असेल असे समजून आम्ही सर्व समस्या सोडवून संपूर्ण रस्ता मोकळा करून टाकू.
सदर निवेदन वाहतूक नियंत्रण अधिकारी वाहतूक नियंत्रण विभाग कार्यालय चंद्रपूर शाखेला आज दिनांक 22.08.2025 ला दिले आणि माझ्या सोबत निवेदन देताना मनसे चे जनहित कक्ष विधी विभागाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रमेश काडबांधे बल्लारपूर तालुका अध्यक्ष जनहित कक्ष राज वर्मा चंद्रपूर शहर अध्यक्ष जनहित कक्ष पीयूष धूपे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष जनहित कक्ष कैलाश वालकोंडे मनसे सैनिक राजवीर सिंग तसेच समस्त मनसे सैनिक उपस्थित होते.















