prabodhini news logo
Home महाराष्ट्र प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिन प्रबोधिनी न्युज नेटवर्क

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिन प्रबोधिनी न्युज नेटवर्क

0
88

क्षमस्व, प्रबोधिनी न्युजचा आज दिनांक २३ रोजी वर्धापनदिन असल्याने कृतज्ञतापूर्वक स्पष्टपणे मांडणी करतो की,प्रबोधिनी न्यूज नेटवर्क हा नुसत संघटन नव्हे तर विचारांचे आदानप्रदान करणारा मुख्यत्वे प्रबोधनकार वर्ग आहेस.या माध्यमातून सहजपणे आपण समाजातील विपरित घडणाऱ्या घटना असो वा प्रसंग यांस वाचा फोडण्यासाठी कविता किंवा लेख स्वरूपात जनजागृती अथवा जनजागरण करण्याची प्रामाणिक पणे जबाबदारी सहजरित्या कर्तव्ये म्हणूनच पार पाडत असतात.या माध्यमातून खरोखरच आपण समाज प्रबोधन करीत आहोत.त्यातूनच जनतेला मिळणारा आनंद आणि उत्साह तसेच त्याद्वारे मिळणारा सामान्य जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तसेच प्रतिक्रिया त्याच जणू फार मौलिक तोलामोलाच्या असतात. म्हणूनच आजच्या शुभ वर्धापनदिनी खरोखरच व्यक्त व्हावे असे मनाने कौल दिला.आणि होय,ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची स्व कर्तव्ये समजतो.
प्रबोधिनी न्यूज नेटवर्कने उत्कृष्ट पध्दतीने आपली धुरा सांभाळली आहे.यात शंकाच नाही. कारण समाज राजकारण,वा अन्य क्षेत्र असो यातील उदभवणाऱ्या अनेकविध समस्या असो घातक संकटे आणि कुठे अनिष्ट प्रथा,परंपरा असतील त्यासंदर्भात अन्याय होत असेल तर साहजिकच वाचा फोडण्यासाठी अतिशय सजग राहून तत्परतेने आपली योग्य ती विशेष पारदर्शक भूमिका त्या त्या परीने आपल्या माध्यमातून निराकरण करण्याचा यशस्वी प्रयत्नशील राहिलेत.आणि खरोखरच,आपली न्यायिक भूमिका अंतरी भारावली. म्हणूनच आजच्या वर्धापनदिनी काहीतरी,थोडेथोडके मोजक्या शब्दांत शब्दांकन पुष्पमाला ओवण्याचा प्रयत्न करीत आहे.
खरं सांगायचं झालं तर या प्रबोधिनी न्यूज नेटवर्कने मज सत्य आणि स्पष्ट बोलायला तर शिकवले. त्यामुळेच लिखाणातून काही समाजातील अनेक निरर्थक,व्यर्थ घडणाऱ्या गोष्टींची योग्य ती जाण ठेऊन लिखाणातून लेखन करण्याचे धाडस निर्माण करून दिलेत.हीच अनुभूती प्रकर्षाने जाणवली.कारण हेच लेखन कौशल्ये प्रबोधिनी न्यूज नेटवर्क मधील अनेक सहाय्यक,प्रेमळ, प्रामाणिक कर्तृत्ववान ,गुणवंत,दातृत्वान, नेतृत्वान, चाणाक्ष,विचारवंत,जबाबदार व्यक्तित्व मान्यवरांच्या विचारातून शिकायला मिळाले.आणि होय,तेच विचार मनात बाळगून लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.त्यामुळेच लेखणीला विचारांची प्रेरकवृत्ती सहज बळावते.प्रबोधिनी न्यूजचे खरच मनापासून आभार व्यक्त करतो की बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळाली.काही महत्त्वाचे विचारही अंतरीच्या गाभाऱ्यात स्थित केलेत.
अहो,लेखणीतून सत्य आणि स्पष्टपणे बोलणारा, लिहिणारा कटू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो.हेच धोरण निश्चितच स्वीकारले.त्यामुळेच तर चांगल्या मार्गाला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.अंत्यत महत्वाचे सांगावेसे वाटते की,गर्व किंवा अहंकार करून कुठल्या आप्तेष्ट असो वा परके नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपता येऊ शकते.हाच उच्चतम अनुभव घेता आला. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात.त्यामुळेच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणं जितक महत्वाच असते. तितकेच योग्य वेळेवर काही निर्णय बदलता येणही खूप गरजेचे असतं.काहीतरी चांगलं होण्यासाठी नेहमीच गप्प रहाणं कधीतरी धोकादायक ठरू शकतं बरं का? याची निश्चितच जाणीव होत असते.म्हणूनच माणसाने वेळेची गरज ओळखून स्वतःचं मत मांडणं खूपच गरजेचं असतं. आणि होय,तेच विशेष बळ आपणाकडून मिळाले.अहो नाहीतर आपलीच माणसं आपल्यालाच हिशोबातून वजा करायला लागतात.हे वेळ निघून गेल्या नंतरच समजते.
सांगायचे तात्पर्य असे की, समाज म्हणजे केवळ लोकांचा जमाव नाही तर लोकांचा एकोपा,एकनिष्ठता, विचार अर्थात मजबूत संघटन असते.म्हणजेच आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल परंतु हिंमत कधीच हारता कामा नये.कारण हीच हिंमत प्रबोधिनी न्यूज नेटवर्क कडून मिळाली.हे छातीठोकपणे सांगू शकतो.आणि होय,जसे प्रांजळ निरपेक्ष विचार जया अंगी असतात म्हणजेच तेच प्रामाणिक सत्य विचार शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत राहिलात. कारण प्रत्येक सर्वसामान्य मनुष्यात अंगीभूत आणि आधारभूत काही गुणवत्ता असते.त्या गुणवत्तेचा शोध घेऊन अथकपणे प्रयत्न,कठीण परिश्रम घेऊन वाटचाल केल्यास कर्तृत्वाची शिखरे गाठता येतात. याची जाणीव झाली.आणि होय,ती खरोखरच अनुभवली देखील यात यत्किंचितही शंका नाही.
अहो,काही गोष्टींचे विशेष महत्त्व जाणले की,दान आणि पुण्य कदाचित पुढच्या जन्मी कामी येईलच.परंतु आज वर्तमानात कालानुरूप बदलानुसार मुलांवर योग्य संस्कार,विचार केले तर याच जन्माचं सार्थक निश्चितच होऊ शकते.सांगायचे तात्पर्य असे की,लक्ष अर्थातच ध्येय साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नसतो.त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं जसे प्रबोधिनी न्यूज नेटवर्क सारखे अन्यायाला विरोध करण्यासाठी तत्पर असणारे माध्यम मिळणंही तितकीच महत्त्वाची असतात.त्याचा निश्चितच फायदा प्रबोधिनी न्यूजमधील मान्यवरांच्या वेळोवेळी दिलेल्या विचार अनुभवांची जाणिवेने शिकलो.तसेच दुस-याचे निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण केलेल कधीही उत्तमच असते.याचीही जणू निश्चितच प्रचिती आली.बरं का !
अहो,समाजात जीवन जगत असतांना माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी खरंच आपोआप घडत जातात.आयुष्यात कधी कधी आपण ज्या गोष्टींची अपेक्षा देखील केलेली नसते.नेमक्या त्या गोष्टी सद्गुरू आपल्याला देत असतात.म्हणून जीवनात प्रामाणिक आणि निश्चित राहा.सतत प्रामाणिक, प्रांजळ, निस्वार्थी सेवा करत राहणे.हेच मनाला नेहमी सांगत राहा.अहो हे पण कटू दिवस जातील चांगले दिवस पण नक्कीच लवकरच येतील.कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका.हीच मनोमन भावना स्थित अंगिकारली.एखाद्यावेळी त्याच व्यक्तीला समजून न घेता गमावू नका. कारण त्यांची काळजी आणि प्रतिमा हृदयात असते.त्यामुळे वाणीत गोडवा,सदभावना,नम्रता असायला हवी.भले ही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल.पण आपल्या शब्दांमुळे कोणाचे नुकसान व्हायला नको हीच भावना मनात बाळगली.म्हणूनच तोच माणूस योग्य आणि कधीतरी उपयुक्त ठरत असतो.याचं भान ठेवूनच योग्य कृती करायला हवे.आणि होय,हाच भाव प्रबोधिनी न्यूज नेटवर्ककडून शिकावयास आणि अनुभवयास मिळाला.याचा मला निश्चितच अभिमान आहे.
जेव्हा आपण प्रगतीच्या वाटेवर असतो.तेव्हा खरंच प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षितच राहतात.कारण काही गोष्टीं निदर्शनास येतात.काही शहाणे वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे असतात.आणि नेमके तेच प्रसिद्ध होतात. काहीवेळा खोटी का असे ना प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्राची व्हायला हवी.कारण चांगला चेहरा सजवायला ,चमकायला काहीशी अवधी लागतो परंतु चांगले चारित्र बनवायला संपूर्ण आयुष्य लागत.याचं निश्चितच भान ठेवावे.समूहातील जबाबदार,गुणवान आणि प्रामाणिक मान्यवरांच्या सानिध्यात राहिल्यामुळे बरेच अनुभव घेता आले.नेहमीच याच माध्यमातून कळले आणि जाणीव झाली.ती म्हणजेच जसे धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात.हेच जणू ब्रीद कामी आले. तसेच अनेक उक्त्या आणि युक्त्याही शिकलो.
कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे असतात.त्यातून बऱ्याच गोष्टी अनुभवता आल्यात.हाच आयुष्यात श्रेष्ठ गुण आहे.जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात.यात यत्किंचितही शंका नाही.प्रबोधिनी न्यूजमध्ये प्रेम व आनंद देणार्‍या व्यक्ती आहेत.त्यामुळे आपल्या सहवासात असणे हीच माझ्यादृष्टीने निसर्गाची एक देणगी आहे.शेवटी अशा मान्यवर व्यक्ती लाभणे.हीच खरी सुस्वभावाची अनमोल परतफेड आहे.म्हणूनच प्रांजळपणे लिखाणाचे धाडस करीत आहे.
अहो,माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात.हाच भाव मनी अंतरी स्वभावात बंद करून ठेवला.त्याच विचारसरणीत वावरत असतो.एक गोष्ट नेमकी आवर्जून लक्षात ठेवली.’ माणसानं कुठूनही घसरावं फक्त नजरेतून घसरू नये.कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात मनावर नाही.पैशांनी पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंत टिकतात हो,परंतु कष्टाने पूर्ण झालेली स्वप्नं इतिहास घडवतात’.स्वताच्या चुका,समस्या सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीही हरवू शकत नाही. येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात.तर आपण काय आणि कोण आहोत याची जाणीव,अनुभूती आणि माहिती करून देण्यासाठी आलेली असतात.म्हणूनच आपली ध्येय नेहमी सकारात्मक आणि आशावादीच असावीत.
आपणही कोणाकडूनही कौतुकाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आपलं कार्य करत राहावं.हीच धारणा प्रबोधिनी न्यूजकडून शिकायला मिळाली.अहो,मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुध्दीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची वा भल्याची प्रार्थना करणाराच असतो.काही सत्कर्म अशीही करावीत की ज्याचा साक्षीदार परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच असूच शकत नसतो.दुःख विकू शकतं नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही.हे दोन्ही आपल्या वाट्याला कर्मानुसार येत असतात.जीवनात अशक्य असे काहीच नाही.म्हणून उत्तमरित्या निस्वार्थी प्रामाणिक सेवा करत राहणे.हीच भावना अंतरी स्थित करावी.
प्रबोधिनी न्यूजमधील मान्यवरांच्या उच्चतम विचारात दंग आणि मग्न झालो.काही गोष्टींची समंजस आणि सामंजस्याने जाणीव झाली की,फक्त जे काही कारणास्तव आपल्याला सोडून गेलेत त्यांना सोडून जाऊ द्या.परंतु जे सोबतीला आहेत.त्याचा निश्चित स्विकार करायला शिका.आयुष्यात जे घडायचे असते ते होतेच. म्हणून त्यावर अतूट विश्वास ठेवायलाच हवा. अहो, जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल जीवनात पुढे बघाल तर आशेची जाणीव होईल.इकडे तिकडे बघाल तर सत्य बघायला मिळेल.जेव्हा आपणच स्वत:च्या स्थित अंतरंगात बघाल तरच प्रामाणिक आत्मविश्वासाची प्रचिती येईल.जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत.तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही.अश्या अनेक गोष्टींची माहिती समूहातील गुणवंत,नामवंत मान्यवरांच्या सानिध्यात जसे आदरणीय श्री रामटेके सरांच्या उपस्थितीत मिळाली.म्हणूनच समूहातील आदरणीय, बहुजन गुणिजनांचे आभार !

शब्दांकन पुष्पमाला
श्री शिवाजी किसन माळी.(मुंबई)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here