prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिनानिमित्त विशेष कविता – आनंदाची पर्वणी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिनानिमित्त विशेष कविता – आनंदाची पर्वणी

0
122

जिवन घडामोडी, बांधीलकी
प्रगल्भतेची विचार सारणी
विचाराच्या सहवासात होते
अधोरेखित शब्दाची जोडणी

प्रबोधिनी संगे नाते जुळले
विचाराना मिळे नवनव्या दिशा
कोमेजलेल्या त्या स्वप्नाच्या
प्रज्वलित झाल्या आशा

महत्त्वाच्या दर्जेदार घडामोडी
आपल्यासाठी आपलीच लेखणी
सुंदर विचार बोधात्मक कवितेसह
रविवारसाठी येते मंच प्रबोधिनी

सत्य विचाराचा सुंगध दरवळो
महाराष्ट्र भर कानाकोपऱ्यात
महत्त्वाच्या घडामोडीचे प्रक्षेपण
पोहचावे घराघरातील मनात

सामाजिक राजकीय क्षेत्रात
असाच रहावा सदैव सहभाग
दिलदारपणाची झलक दाखवून
गोरगरिबांना मिळावा मदतीचा हात

आपलेच शब्द आपलेच लिखान
रविवारची प्रभात प्रसन्न होते
मनात नवनव्या लिखाणासाठी
नव्या विषयावर नवा उत्साह येते

वर्धापनदिन मोलाचा आम्हासाठी
ही आनंदाचीच आहे पर्वणी
बातम्या काव्य लेखणा देते साद
स्फूर्ती उत्साह वाढविते प्रबोधिनी ……

नंदा भगत
कारंजा लाड, वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here